• Home
 • »
 • News
 • »
 • videsh
 • »
 • काबुल विमानतळावरील आत्मघातकी हल्लेखोर होता भारतातील तुरुंगात, ISIS चा खळबळजनक दावा

काबुल विमानतळावरील आत्मघातकी हल्लेखोर होता भारतातील तुरुंगात, ISIS चा खळबळजनक दावा

काबुल विमानतळावर आत्मघातकी हल्ला (Suicide bomber at Kabul airport was in Indian jail) करून शेकडो बळी घेणारा दहशतवादी हा 5 वर्षांपूर्वी भारतातील तुरुंगात होता, असा खळबळजनक दावा आयसीसनं केला आहे.

 • Share this:
  काबुल, 19 सप्टेंबर : काबुल विमानतळावर आत्मघातकी हल्ला (Suicide bomber at Kabul airport was in Indian jail) करून शेकडो बळी घेणारा दहशतवादी हा 5 वर्षांपूर्वी भारतातील तुरुंगात होता, असा खळबळजनक दावा आयसीसनं केला आहे. आयसीस खुरासान (Islamic State of Khurasan province) या संघटनेनं केलेल्या दाव्यानुसार काबुलमध्ये आत्मघातकी हल्ला करणाऱ्या दहशतवाद्याचं नाव अब्दुर रहमान अल-लगोरी (Abdur Rehman al-Lagori) होतं. 5 वर्षांपूर्वी जम्मू काश्मीरमध्ये (was arrested form Jammu and Kashmir) त्याला अटक करण्यात आली होती. अब्दुर रहमान का आला भारतात? काश्मीरमध्ये कारवाया करण्यासाठी आणि आत्मघातकी हल्ला करून शेकडो हिंदूंचे प्राण घेण्याच्या उद्देशानं अब्दुल रहमान काश्मीरमध्ये आला होता. मात्र त्याने काही करण्यापूर्वीच जम्मू काश्मीर पोलिसांनी कारवाई करून त्याला अटक केली होती. त्यानंतर तो काही काळ भारतातील तुरुंगात होता. भारतातून तो अफगाणिस्तान गेला आणि काश्मीरमधील आपलं स्वप्न त्यांनं काबुल विमानतळाबाहेर पूर्ण केलं, असा दावा आयसीसनं त्यांच्या प्रोपगंडा पत्रिकेत नमूद केला आहे. भारतीय यंत्रणांची चिंता वाढली आय़सीसच्या या दाव्यात तथ्य असल्याचं भारतातील सुरक्षा यंत्रणांमधील सूत्रांकडून समजत आहे. 2016 साली खऱोखरच एक ऑपरेशन राबवण्यात आलं होतं, ज्यात एका तरुणाला अटक करण्यात आली होती. दिल्लीत विद्यार्थी असल्याचं ढोंग करणाऱ्या एका दहशतवाद्याला पोलिसांनी पकडलं होतं. त्यानंतर त्याला भारतीय तुरुंगातची हवा खावी लागली होती. मात्र या संघर्षानंतर अब्दुर रहमान आपल्या निर्धारावरून परावृत्त झाला नाही, असं आयसीसनं म्हटलं आहे. त्यानंतर तो घरी जाता थेट अफगाणिस्तानात आला आणि आत्मघातकी हल्ला करून आपलं स्वप्न पूर्ण केलं, असं त्यांनी म्हटलं आहे. हे वाचा -शेजाऱ्याच्या चुकीमुळे मोठी दुर्घटना; क्षणात जमीनदोस्त झाली 3 मजली इमारत, VIDEO हल्ल्यात गेले होते शेकडो प्राण अफगाणिस्तानमध्ये तालिबानची सत्ता आल्यानंतर हजारो लोक देश सोडून बाहेर पडण्याच्या तयारीत असतानाच काबुल आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या परिसरात जोरदार आत्मघातकी हल्ला झाला होता. या हल्ल्यात 200 पेक्षा अधिक नागरिकांचा मृत्यू झाला होता. तर अमेरिकेचे 7 सैनिक या हल्ल्यात ठार झाले होते.
  Published by:desk news
  First published: