मराठी बातम्या /बातम्या /विदेश /उत्तर कोरियाच्या किम जोंगचे बाप ठरतील असे 5 महाक्रूर हुकूमशहा, एकाने तर करवले 15 लाख महिलांवर बलात्कार!

उत्तर कोरियाच्या किम जोंगचे बाप ठरतील असे 5 महाक्रूर हुकूमशहा, एकाने तर करवले 15 लाख महिलांवर बलात्कार!

उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग उनबद्दल बोलताना लोक हा एक क्रूर हुकुमशहा असल्याचे म्हणतात. पण इतिहासात असे हुकूमशहा होऊन गेले आहेत, ज्यांच्या क्रौर्यापुढे किम जोंगही फिका पडू लागतो.

उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग उनबद्दल बोलताना लोक हा एक क्रूर हुकुमशहा असल्याचे म्हणतात. पण इतिहासात असे हुकूमशहा होऊन गेले आहेत, ज्यांच्या क्रौर्यापुढे किम जोंगही फिका पडू लागतो.

उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग उनबद्दल बोलताना लोक हा एक क्रूर हुकुमशहा असल्याचे म्हणतात. पण इतिहासात असे हुकूमशहा होऊन गेले आहेत, ज्यांच्या क्रौर्यापुढे किम जोंगही फिका पडू लागतो.

नवी दिल्ली, 30 एप्रिल : आजच्या काळात जगातील बहुतेक देश स्वतंत्र आहेत, तेथे लोकशाही सरकारचं राज्य आहे. जनता स्वतः आपलं सरकार निवडते आणि त्या बदल्यात सरकार जनतेच्या सुविधांची काळजी घेते. जनतेच्या अपेक्षांवर सरकार चालले नाही तर निवडणुकीत त्यांची खुर्ची काढून घेतली जाते. पण असे काही देश आहेत, जिथे आजही हुकूमशहाची राजवट चालते. या देशांमध्ये सरकार हे लोकांच्या मर्जीचे नसते. तर, हुकूमशहा स्वतःच्या इच्छेने देश चालवतात.

हुकूमशहाबाबत बोलायचं झालं तर, आताच्या काळात उत्तर कोरियाचा हुकुमशहा किम जोंग उनचं (North Korean dictator Kim Jong Un) नाव अग्रक्रमानं येतं. उत्तर कोरियातही हाच नियम सुरू आहे. त्यांनी केलेले नियम न पाळणं म्हणजे मृत्यूला आमंत्रण देणं होय. किम जोंग यांच्यासाठी कोणतीही चूक लहान नाही. गुन्हा कोणताही असो, त्या व्यक्तीला कठोर शिक्षा होते. पण इतिहासात किम जोंग यांच्यापेक्षाही क्रूर हुकूमशहा झाले आहेत. त्याची फर्मानं आणि त्यांना झालेल्या शिक्षा हृदय पिळवटून टाकणाऱ्या होत्या.

brutal dictators

अॅडॉल्फ हिटलर (1889-1945)

हुकूमशहाचा उल्लेख होताच हिटलरचं (Adolf Hitler) नाव प्रथम येतं. नाझी पक्षाच्या हिटलरमुळेच दुसरं महायुद्ध सुरू झालं. तो ज्यू लोकांचा द्वेष करत असे. त्याने या वंशाच्या लोकांना ठार करण्यासाठी छावण्या तयार केल्या होत्या आणि त्यांना गॅस चेंबरमध्ये मारलं जायचं. त्याने आपल्या आयुष्यात जवळपास 5 कोटी लोकांची हत्या केल्याचं सांगितलं जातं. 1945 मध्ये जेव्हा त्याने आत्महत्या केली, तेव्हा त्याच्या क्रूरतेचा अंत झाला.

brutal dictators

जोसेफ स्टॅलिन (1878-1953)

जोसेफ स्टॅलिन (Joseph Stalin) 1922 मध्ये सोव्हिएत युनियनचा हुकूमशहा बनला. तरुणपणी तो चोर आणि खुनी होता. त्याच्या 30 वर्षांच्या कारकिर्दीत त्याने सुमारे 20 कोटी लोकांची हत्या केली आणि त्याच्या आदेशावरून 15 लाख जर्मन महिलांवर बलात्कार झाला. 1953 मध्ये हृदयविकाराच्या झटक्यानं त्याचं निधन झालं.

brutal dictators

पोल पॉट (1925-1998)

कंबोडियाच्या पोल पॉट (Pol Pot) या हुकूमशहाने क्रूरतेची नवी कहाणी जन्माला घातली. लोकांची हत्या करून तो त्यांच्या कवट्या गोळा करत असे. तसंच, तो लहान मुलांना मधून फाडण्यात त्याला आनंद मिळायचा. 1979 मध्ये त्यांची सत्ता संपुष्टात आली आणि 1998 मध्ये त्याने तुरुंगात अखेरचा श्वास घेतला.

brutal dictators

सद्दाम हुसेन (1937-2006)

इराकमध्ये 1979 ते 2003 या काळात सद्दाम हुसेनने (Saddam Hussein) लाखो लोकांवर हल्ले केले. तो शत्रूंचे डोळे काढत असे. यासोबतच तो अनेक प्रकारचे अत्याचार करत असे. 2006 मध्ये त्याला त्याच्या गुन्ह्यांसाठी फाशी देण्यात आली.

brutal dictators

एड अमीन (1952-2003)

युगांडाचा अध्यक्ष बनलेल्या एड अमीनला (Ed Amin) युगांडाचा  मारेकरी म्हणतात. असे म्हणतात की, तो आपल्या शत्रूंना मगरींना खाऊ घालत असे. तसेच तो स्वतः नरभक्षक होता. त्याने आपल्या एका पत्नीची हत्या करून तिच्या मृतदेहाचे छोटे तुकडे केले. असं म्हटलं जातं की, 1971 ते 1979 दरम्यान त्याने अर्धा दशलक्षाहून अधिक लोकांची हत्या केली. ऑगस्ट 2003 मध्ये त्याचं नैसर्गिक कारणांनी निधन झालं.

First published:

Tags: Kim jong un, North korea