तुमची ही छोटीशी चूक पडेल महागात, व्हाल Coronavirus चे शिकार

तुमची ही छोटीशी चूक पडेल महागात, व्हाल Coronavirus चे शिकार

मास्क (mask) न घालता घराबाहेर पडणं ही सर्वात मोठी चूक आहे, असं चीनच्या (china) एका शास्त्रज्ञाने म्हटलं आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 06 एप्रिल : कोरोनाव्हायरसने (Coronavirus) संपूर्ण जगात थैमान घातलं आहे. प्रत्येक तासाला रुग्णांचा आणि मृतांचा आकडा वाढतो आहे. त्यामुळे सर्दी-खोकला आहे, त्यांनीच मास्क वापरावा, सरसकट सर्वानी मास्क वापरण्याची गरज नाही,असं म्हणणा-या जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) आता सर्वांनी मास्क घालण्याच्या म्हणजे किमान तोंड, नाक झाकलं जाईल असा घरगुती मास्क वापरण्याचा सल्ला दिला आहे. तसंच सर्वांनी मास्क घालव्यात अशा सूचना अमेरिकेत आणि आता भारतातही सरकारने दिल्या आहेत.

मास्क घालणं किती महत्त्वाचं आहे, याबाबत सायन्स वेबसाईटने चीनी शास्त्रज्ञ जॉर्ज गाओ यांच्याकडून जाणून घेतलं. जॉर्ज गाओ हे चायनीज सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शनचे प्रमुख आहेत.  मास्क न घालता घराबाहेर पडणं धोकायदायक आहे, असं ते म्हणाले.

नोटांवर थुंकण्याऱ्या विकृतांवर उद्धव ठाकरे संतापले, कडक शब्दांत दिला इशारा

जॉर्ज गाओ यांनी सांगितलं, "प्रत्येकाने मास्क घालणं गरजेचं आहे. युरोप आणि अमेरिकेतील लोकं मास्क घालत नाहीत हीच त्यांची सर्वात मोठी चूक आहे. हा व्हायरस ड्रॉपलेटस आणि संपर्कामुळे पसरतो. जेव्हा तुम्ही बोलता तेव्हा तोंडातून ड्रॉपलेटस बाहेर पडतात. अनेकदा कोरोनाव्हायरसची लक्षणं दिसत नाहीत. अशा वेळी तुम्ही मास्क घातला नाही, तर व्हायरस तुमच्यापर्यंत पोहोचू शकतो."

त्यामुळे तुम्ही अशी चूक करू नका. मास्क लावून किंवा तोंड, नाक झाकलं जाईल याची खबरदारी घेऊनच घराबाहेर पडा आणि कोरोनाव्हायरसपासून स्वत:चा बचाव करा.

पाकिस्तानचा धक्कादायक कट, कोरोना झालेल्या दहशतवाद्यांना भारतात पाठवण्याची तयारी

First published: April 6, 2020, 8:21 AM IST

ताज्या बातम्या