नवी दिल्ली, 06 एप्रिल : कोविड-19 या साथीच्या रोगाचा प्रसार हळूहळू सर्व जगात झाला आहे. भारतातही कोरोना विषाणूच्या संसर्गाचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळं सध्या भारतात 21 दिवसांचा लॉकडाउन घोषित करण्यात आला आहे. त्यामुळं 14 एप्रिलपर्यंत हा लॉकडाउन असणार आहे. मात्र सोशल मीडियावर सध्या जागतिक आरोग्य संघटेनेचे (WHO) एक वेळापत्रक व्हायरल होत आहे. यामध्ये 10 जूनपर्यंत लॉकडाउन होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) जगातील सर्वात धोकादायक व्हायरस नियंत्रित करण्यासाठी लॉकडाउन कालावधीची प्रोटोकॉल आणि पद्धतींची रूपरेषा आखली आहे आणि भारत सरकार त्यानुसार लॉकडाउन जाहीर करीत आहे, असे या मेसेजमध्ये सांगण्यात आले आहे. मात्र हे मेसेज फेक असल्याचे जागतिक आरोग्य संघटेनेन ट्वीट करत सांगितले. याआधी 22 मार्च रोजी भारतात एक दिवसाचा लॉकडाउन जाहीर करण्यात आला आणि 24 मार्चच्या रात्री पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात 21 दिवसांच्या लॉकडाउनची घोषणा केली. वाचा- तुमची ही छोटीशी चूक पडेल महागात, व्हाल Coronavirus चे शिकार या व्हायरल मेसेजमध्ये असा दावा केला आहे की WHO प्रोटोकॉल आणि धोकादायक विषाणूवर नियंत्रण ठेवण्याच्या पद्धतींनुसार प्रथम एक दिवस लॉकडाउन, त्यानंतर 21 दिवसांचा लॉकडाउन, त्यानंतर पाच दिवसांचा ब्रेक, त्यानंतर 28 दिवस लॉकडाउन, त्यानंतर पाच दिवस ब्रेकनंतर चौथ्या टप्प्यात 15 दिवसांचे लॉकडाउन केले पाहिजे. त्यानुसार, 15 एप्रिल ते 19 एप्रिल दरम्यान लॉकडाउन आणि त्यानंतर 20 एप्रिल ते 18 मे या कालावधीत लॉकडाउन केले जाईल. मात्र हे सर्व दावे खोटे असल्याचे समोर आले आहे. वाचा- VIDEO : कोरोनाला पळवून लावण्यासाठी भाजपच्या महिला अध्यक्षाचा हवेत गोळीबार
वाचा- VIDEO: दिवे लावण्याऐवजी तोंडातून काढले आगीचे लोळ, नंतर चेहऱ्यालाच लागली आग मात्र, WHO दक्षिण-पूर्व आशियाच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून हे सर्व मेसेज खोटे असल्याचे सांगण्यात आले आहे. या ट्विटमध्ये असे म्हटले आहे की, ‘सोशल मीडियावर डब्ल्यूएचओच्या लॉकडाउन प्रोटोकॉलविषयी सातत्याने शेअर केले जाणारे संदेश निराधार व खोटे आहेत. लॉकडाऊन संदर्भात डब्ल्यूएचओची कोणतीही प्रोटोकॉल किंवा पद्धत नाही. या ट्विटमध्ये भारतीय आरोग्य मंत्रालय, पीआयबी इंडिया आणि यूएन इंडियाचे अधिकृत ट्विटर अकाउंट टॅग केले आहे.
Messages being circulated on social media as WHO protocol for lockdown are baseless and FAKE.
— WHO South-East Asia (@WHOSEARO) April 5, 2020
WHO does NOT have any protocols for lockdowns. @MoHFW_INDIA @PIB_India @UNinIndia
वाचा- लॉकडाउनच्या काळात मुलांना शिकवा या गोष्टी, भविष्यात येतील कामी एकीकडे कोरोना विषाणूच्या संसर्गाची 3500 पेक्षा जास्त प्रकरणे भारतात नोंदली गेली आहेत, तर या साथीमुळे 83 लोकांचा बळी गेला आहे. जगभरात 1.2 दशलक्षाहूनही अधिक लोकांना याचा संसर्ग झाला आहे, तर 60 हजाराहून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळं या विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाउनपेक्षा योग्य पर्याय नाही. मात्र भारतात 14 एप्रिलनंतर लॉकडाउन वाढवण्यात येणार आहे का? याबाबत अद्याप काहीही माहिती नाही आहे.