बीजिंग 12 मे : चीनच्या चाँगकिंग शहरात आज सकाळी मोठी दुर्घटना घडली. शहरातील विमानतळावर तिबेट एअरलाइनच्या एका प्रवासी विमानाला भीषण आग लागली. उड्डाण घेताना विमान घसरल्याने ही आग लागल्याचं सांगितलं समोर येत आहे. ‘साऊथ चायना मॉर्निंग पोस्ट’च्या वृत्तानुसार, तिबेट एअरलाइन्सचं विमान TV9833 पश्चिम चीनमधील चाँगकिंग जिआंगबेई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या धावपट्टीवरून उड्डाण करत असताना ही आग लागली (Plane Catches Fire at China’s Chongqing Airport). घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल (Video of Plane Catches Fire) होत आहे. चालत्या ट्रेनमधून कोसळली महिला; रेल्वेखाली जाणार इतक्यात अवतरला ‘देवदूत’, Shocking Video सरकारी प्रसारक सीसीटीव्हीनुसार, गुरुवारी सकाळी पोस्ट केलेल्या व्हिडिओ फुटेजमध्ये चाँगकिंग जिआंगबेई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या धावपट्टी भागावर तिबेट एअरलाइन्सच्या विमानातून आग आणि काळा धूर निघताना दिसत आहे.
चीन: उड्डाण करतानाच विमानाला लागली भीषण आग, प्रवासी सुरक्षित pic.twitter.com/XaWUq7trmF
— News18Lokmat (@News18lokmat) May 12, 2022
यादरम्यान प्रवासी विमानाच्या मागील दारातून बाहेर पडताना दिसतात. विमानातील आग विझवण्यात आली असून धावपट्टी बंद करण्यात आल्याचं समोर आलं आहे. तिबेट एअरलाइन्सने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वीबोवर एका पोस्टमध्ये म्हटलं आहे की सर्व 113 प्रवासी आणि नऊ क्रू सदस्यांना बाहेर काढण्यात आलं आहे. काही लोकांना किरकोळ दुखापत झाली, त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.. बाईकला धडक देणाऱ्या महिला कार चालकासोबत तरुणाचं शॉकिंग कृत्य; हैराण करणारा VIDEO फ्लाइट TV9833 तिबेटमधील न्यिंगचीसाठी निघणार होती इतक्यात ही आग लागली. या अपघाताची चौकशी करण्यात येत असल्याचं विमान कंपनीनं म्हटलं आहे. याआधी दोन महिन्यांपूर्वी चीनमध्ये भीषण अपघात झाला होता. यात चीनच्या इस्टर्न एअरलाइन्सचं विमान कोसळले होतं. गुआंगशी झुआंगमध्ये हा अपघात झाला होता. यात 132 जणांचा मृत्यू झाला होता. यातील 123 प्रवासी तर 9 क्रू मेंबर्स होते.

)







