मुंबई, 10 मे : देशात कोरोनाबाधित (Coronavirus) रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. सध्या हा आकडा 60 हजारहून जास्त झाला आहे. कोरोनाचे सर्वात जास्त संक्रमण हे महाराष्ट्र (Maharashtra) राज्यात झाले आहे. एकट्या महाराष्ट्रात कोरोनाबाधितांच्या संख्या 20 हजारहून जास्त झाली आहे. ही रुग्ण संख्या एकूण संख्येच्या 33% आहे. महाराष्ट्रात सतत वाढणाऱ्या या प्रकरणांमुळे क्रेंद्र सरकारच्या चिंता वाढवल्या आहेत. शनिवारी महाराष्ट्रात 1165 नवीन प्रकरणांची नोंद झाली. त्यानंतर हा आकडा 20 हजारहून जास्त गेला. कोरोनामुळं देशभरात आतापर्यंत 2 हजारहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे, तर आतापर्यंत 18 हजार लोकं निरोगी होऊन घरी परतले आहेत. एकट्या महाराष्ट्रात मृतांचा आकडा हा 800च्या आसपास आहे. राज्यात गेल्या 24 तासांत 1165 नवीन प्रकरणांची नोंद झाली. यातील मुंबईतील 722 प्रकरणे आहेत. तर, 27 लोकांचा मृत्यू झाला आहे. देशाची आर्थिक राजधानी मानल्या जाणाऱ्या मुंबई एकूण 12 हजार 864 प्रकरणे आहेत. तर मृतांचा आकडा हा 500च्या घरात आहे. वाचा- BREAKING: मुंबईत रहिवासी चाळ कोसळली, 5-6 नागरिक दबल्याची शक्यता एका अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या 24 तासांत देशात 48 लोकांचा मृत्यू झाला आहे. यातील 27 मुंबई शहरातील, 9 पुणे, 8 मालेगाव, तर अकोला, नांदेड आणि अमरावतीत प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला आहे. मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीत, मुंबईतील धारावी परिसरात 5 लोकांचा मृत्यू झाला, ज्यांच्यावर कोरोनाचे उपचार करून निरोगी रुग्ण म्हणून डिस्चार्ज देण्यात आला होता. वाचा- लॉकडाऊनमध्ये आणखी एक भीषण अपघात, ट्रकमधून लपून घरी जाणाऱ्या 5 लोकांचा मृत्यू 15 जिल्ह्यांमध्ये 64% प्रकरणे देशातील 5 जिल्ह्यांमध्ये 64% प्रकरणे आहेत. यातील दिल्ली, पुणे, मुंबई, अहमदाबाद आणि चेन्नई येथील जिल्ह्यांमध्ये 50% प्रकरणे आहेत. सध्या या 5 शहरांमधील परिस्थिती चिंताजनक आहे. त्यामुळं देशात 17 मेपर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आला असला तरी, या 5 शहरांमध्ये हा कालावधी सरकारच्या वतीनं आणखी वाढवण्याची शक्यता आहे.
राज्यातील पोलिसांना कोरोनाचा धोका दुसरीकडे महाराष्ट्र पोलिसांतही कोरोनाचे संक्रमण दिवसेंदिवस वाढत आहे. आतापर्यंत राज्यातील एकूण 714 पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. तर 61 पोलिसांनी कोरोनावर मात केली आहे. आतापर्यंत 5 पोलिसांचा कोरोनामुळं मृत्यू झाला आहे. वाचा- भारताने कोरोनावर वॅक्सिन बनवण्यासाठी उचललं मोठं पाऊल, प्राण्यांवर होणार ट्रायल संपादन, संकलन-प्रियांका गावडे.