जाहिरात
मराठी बातम्या / बातम्या / भारताने कोरोनावर वॅक्सिन बनवण्यासाठी उचललं मोठं पाऊल, प्राण्यांवर होणार ट्रायल

भारताने कोरोनावर वॅक्सिन बनवण्यासाठी उचललं मोठं पाऊल, प्राण्यांवर होणार ट्रायल

भारताने कोरोनावर वॅक्सिन बनवण्यासाठी उचललं मोठं पाऊल, प्राण्यांवर होणार ट्रायल

इटली आणि इस्राईलसारख्या देशांनी कोव्हिड - 19 ही लस बनवल्याचा दावा केला आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 09 मे : कोरोना विषाणूमुळे संपूर्ण जगात हाहाकार माजला आहे. दररोज कोरोना विषाणूच्या रुग्णांची संख्या वाढत असल्याचं दिसून येत आहे. भारतातही कोरोना विषाणूचे रुग्ण सतत वाढत आहेत. दरम्यान, कोरोना विषाणूच्या लसीसाठी भारतानं महत्त्वपूर्ण पाऊल उचललं आहे. कोरोना विषाणूच्या निर्मूलनासाठी जगभरात लसी शोधण्यात आल्या आहेत. इटली आणि इस्राईलसारख्या देशांनी कोव्हिड - 19 ही लस बनवल्याचा दावा केला आहे. त्याच बरोबर, भारतानेही कोरोना विषाणूची लस बनवण्याच्या दिशेने प्रयत्न सुरू केला आहे. इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने (आयसीएमआर) भारत बायोटेक इंटरनेशनल लिमिटेडच्या सहकार्यानं देशातील कोव्हिड - 19ची लस तयार करण्याच्या दिशेनं काम सुरू केलं आहे. या दोन्ही कंपन्या कोरोनाच्या उपचारांसाठी देशात लस तयार करण्याचा प्रयत्न करीत आहेत. कोरोना विषाणूची लस तयार करण्यासाठी पुण्यातील लॅबमधून व्हायरस स्ट्रेन्स भारत बायोटेकला पाठवण्यात आले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, जर लस तयार झाली तर प्रथम त्याची चाचणी जनावरांवर केली जाईल. प्राण्यांवर यशस्वी चाचणी घेतल्यानंतर मानवांवर प्रयत्न केला जाईल. क्षणभर रागाने कुटुंब संपलं, पत्नी आणि मुलाचा जीव घेतल्यावर पतीचं धक्कादायक कृत्य क्लिनिकल चाचणी उपक्रम ‘आजतक’च्या ई-अजेंडा कार्यक्रमात केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन म्हणाले की, ‘लस ​​पासून औषध शोधापर्यंत आयुष औषधांना पाठिंबा देण्याच्या बाबतीत पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वत: अग्रणी आहेत. भारताच्या इतिहासात प्रथमच आयुषच्या काही औषधांविषयी क्लिनिकल चाचण्या सुरू केल्या आहेत. येणार्‍या काळात हे एक ऐतिहासिक पाऊल असू शकतं. भारतातही लसवर शास्त्रज्ञ पूर्ण भर देत आहेत. VIDEO: कोरोनाच्या विळख्यात मुंबईकरांसाठी आली Good News, पहिल्यांदाच घडलं असं संपादन - रेणुका धायबर

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: corona
  • First Published :
जाहिरात
जाहिरात