• Home
 • »
 • News
 • »
 • videsh
 • »
 • ईशा अंबानींच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा! दी स्मिथसॉनियन्स नॅशनल म्युझियम ऑफ एशियन आर्ट्सच्या विश्वस्त मंडळात नियुक्ती

ईशा अंबानींच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा! दी स्मिथसॉनियन्स नॅशनल म्युझियम ऑफ एशियन आर्ट्सच्या विश्वस्त मंडळात नियुक्ती

अमेरिकेतल्या दी स्मिथसॉनियन्स नॅशनल म्युझियम ऑफ एशियन आर्ट्सच्या विश्वस्त मंडळात भारतीय उद्योजिका ईशा अंबानी यांची नियुक्ती झाली आहे. ईशा अंबानी यांच्यासह कॅरोलीन ब्रेह्म आणि पीटर किम्मेलमन यांचीही विश्वस्त मंडळात नियुक्ती करण्यात आली आहे.

 • Share this:
  मुंबई, 28 ऑक्टोबर: अमेरिकेतल्या दी स्मिथसॉनियन्स नॅशनल म्युझियम ऑफ एशियन आर्ट्सच्या (The Smithsonian’s National Museum of Asian Art) विश्वस्त मंडळात (Isha Ambani as Board of Trustees of The Smithsonian’s National Museum of Asian Art) भारतीय उद्योजिका ईशा अंबानी यांची नियुक्ती झाली आहे. उद्योगपती मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांची कन्या असलेल्या ईशा अंबानी रिलायन्स जिओ इन्फोकॉम लिमिटेडच्या (Reliance Jio Infocomm Ltd.) संचालिका आहेत. ईशा अंबानी यांच्यासह कॅरोलीन ब्रेह्म (Carolyn Brehm) आणि पीटर किम्मेलमन (Peter Kimmelman) यांचीही विश्वस्त मंडळात नियुक्ती करण्यात आली आहे. दी स्मिथसॉनियन्स नॅशनल म्युझियम ऑफ आर्ट या संस्थेतर्फे प्रसिद्धीपत्रकाद्वारे याबद्दलची माहिती देण्यात आली आहे. या सर्वांची नियुक्ती 23 सप्टेंबर 2021 पासून चार वर्षांसाठी असेल, असंही संस्थेनं स्पष्ट केलं आहे. या संस्थेच्या 17 सदस्यीय बोर्ड ऑफ रीजंट्समध्ये अमेरिकेचे सरन्यायाधीश, अमेरिकेच्या उपाध्यक्षा, अमेरिकेच्या सिनेटमधले तीन सदस्य, अमेरिकेतल्या प्रतिनिधीगृहातले तीन सदस्य आणि नऊ नागरिक यांचा समावेश असतो. स्मिथसॉनियन संस्थेचं प्रशासन हे मंडळ पाहतं. हे वाचा-दिवाळीपर्यंत महागणार LPG Gas Cylinder! जुलै 2021 पासून 90 रुपयांनी वाढले दर म्युझियमच्या बोर्ड ऑफ ट्रस्टीज अर्थात विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष अँटॉइन व्हॅन आग्टमाएल (Antoine van Agtmael) यांच्या कार्यकाळाला ऑक्टोबर 2023पर्यंत मुदतवाढ देण्यात येत असल्याची घोषणाही संस्थेने केली आहे. मंडळाचे उपाध्यक्ष म्हणून डॉ. विजय आनंद (Dr. Vijay Anand) यांची, तर मंडळाच्या सचिव म्हणून पामेला एच. स्मिथ (Pamela H. Smith) यांची नियुक्ती करण्यात आल्याचंही जाहीर करण्यात आलं आहे. ईशा अंबानी यांनी येल युनिव्हर्सिटी आणि स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीतून शिक्षण घेतलं आहे. 2011 साली ईशा अंबानी यांना भारतात इंटरनेटचा वेग कमी असल्याची प्रकर्षाने जाणीव झाली. त्यातूनच 2016 साली त्यांच्या नेतृत्वाखाली जिओची स्थापना झाली. त्यातून ऑल आयपी, ऑल फोर-जी वायरलेस टेलिकम्युनिकेशन्स सेवा सुरू झाल्या. त्यातून भारतात डिजिटल क्रांती (Digital Evolution in India) सुरू झाली. त्यामुळे भारत जगातल्या आघाडीच्या मोबाइल डेटा बाजारपेठेपैकी एक बनण्यास हातभार लागला. आज 440 दशलक्ष युझर्ससह जिओ हा देशातला सर्वांत मोठा मोबाइल नेटवर्क ऑपरेटर आहे. अलीकडेच जिओ प्लॅटफॉर्म्स लिमिटेडमध्ये 20 अब्ज डॉलर्सहून अधिक जागतिक इक्विटी कॅपिटलची गुंतवणूक झाली. त्यात फेसबुकचाही समावेश आहे. हे वाचा-लहान मुलांना Bike वर बसवण्यासाठीचा नियम बदलणार, मोदी सरकारने सांगितले नवे नियम या सर्व डील्समध्ये ईशा अंबानी यांचा महत्त्वपूर्ण सहभाग होता. कस्टमर एक्सपिरिअन्स आणि रिलायन्स रिटेल, जिओ यांच्या मार्केटिंग ब्रँडिंगचं व्यवस्थापन ईशा अंबानी यांच्याकडे आहे. Ajio.com हे फॅशन पोर्टलदेखील त्यांच्याच संकल्पनेतून साकार झालं आहे. छोट्या आणि मध्यम उद्योजकांना ई-कॉमर्सचं पाठबळ देणाऱ्या जिओमार्टची जबाबदारीही त्या सांभाळतात. रिलायन्स फाउंडेशन या देशातल्या सर्वांत मोठ्या फाउंडेशनच्या त्या संचालिका आहेत. भारताचा सांस्कृतिक वारसा, भारतीय कला यांची जपणूक करणं आणि त्याबद्दलची जाणीव जागृत करणं असा रिलायन्स फाउंडेशनचा उद्देश आहे. भारतीय कला जागतिक पातळीवर नेणं आणि जागतिक कला भारतात आणणं यासाठी त्यांचे प्रयत्न आहेत. कलेच्या उपलब्धतेच्या लोकशाहीकरणासाठी आपण कटिबद्ध असल्याचं त्या म्हणतात. भारतीय कला हा त्यांचा आवडीचा विषय असून, ती अधिकाधिक जणांपर्यंत पोहोचवणं ही त्यांची पॅशन आहे. दरम्यान कॅरोलिन ब्रेह्म या 2008पासून म्युझियमशी निगडित असून, त्या कॉर्पोरेट एक्झिक्युटिव्ह आणि लेक्चरर आहेत. जागतिक सरकारी नातेसंबंध, सार्वजनिक धोरणं आणि आंतरराष्ट्रीय व्यापार या विषयांत त्यांना 40 वर्षांहून अधिक अनुभव आहे. तर किम्मेलमॅन हे 2015 ते 2019 या कालावधीत बोर्डाचे अध्यक्ष होते. ते व्हार्टन स्कूल आणि हार्वर्ड लॉ स्कूलचे ग्रॅज्युएट आहेत. या क्षेत्रातला त्यांचा अनुभव दांडगा आहे. हे वाचा-'ते काम होत नसेल तर बदली करून घ्या'; शाहांनी काश्मीरमधील अधिकाऱ्यांना खडसावलं दी नॅशनल म्युझियम ऑफ एशियन आर्ट हे स्मिथसॉनियनचं पहिलं समर्पित आर्ट म्युझियम असून, नॅशनल मॉलमधलंही पहिलंच आर्ट म्युझियम आहे. दी फ्रीअर गॅलरी ऑफ आर्ट आणि आर्थर एम. सॅक्लर गॅलरी, दी स्मिथसॉनियन्स नॅशनल म्युझियम ऑफ एशियन आर्ट या संस्था अमेरिकेत वॉशिंग्टन डीसीमध्ये नॅशनल मॉलमध्ये स्थित आहेत. आशियाई कलेचं जतन, संवर्धन, प्रदर्शन आणि कलेचे ते प्रकार समजून घेणं हा त्यांचा उद्देश आहे. निओलिथिक कालावधीपासून आजपर्यंतच्या काळातल्या आशियाई कलेचं दर्शन घडवणाऱ्या 45 हजारांहून अधिक वस्तू या कलासंग्रहालयात आहेत. चीन, जपान, कोरिया, दक्षिण आणि आग्नेय आशिया आणि पुरातन पौर्वात्य आणि इस्लामिक जगतातल्या कलात्मक वस्तूंचा त्यात समावेश आहे. 19व्या शतकातल्या उत्तरार्धातल्या अमेरिकेतल्या कलेचं दर्शन घडवणाऱ्या महत्त्वाच्या कलावस्तूंचा संग्रहही तिथे आहे. जेम्स मॅकनिल व्हिसलरच्या वैविध्यपूर्ण कलाकारीचा जगातला सर्वांत मोठा संग्रह इथे आहे. प्रदर्शनं, प्रकाशनं, संवाद, संशोधन आणि शिक्षण आदींच्या माध्यमातून आशियाई कला समजून घेण्याचे प्रयत्न दी नॅशनल म्युझियम ऑफ एशियन आर्ट ही संस्था करत असते.
  First published: