• Home
 • »
 • News
 • »
 • money
 • »
 • Diwali पर्यंत पुन्हा महागणार LPG Gas Cylinder! जुलै 2021 पासून 90 रुपयांनी वाढले आहेत दर

Diwali पर्यंत पुन्हा महागणार LPG Gas Cylinder! जुलै 2021 पासून 90 रुपयांनी वाढले आहेत दर

LPG Gas Rates: याआधी 6 ऑक्टोबर 2021 रोजी 14 किलोच्या घरगुती एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत 15 रुपयांची वाढ करण्यात आली होती. दरम्यान जुलै 2021 पासून आतापर्यंत LPG Gas Cylinder च्या दरात 90 रुपयांची वाढ करण्यात आली आहे.

 • Share this:
  नवी दिल्ली, 28 ऑक्टोबर: गेल्या बऱ्याच काळापासून सामान्य नागरिक महागाईचा सामना करत आहेत. पेट्रोल-डिझेलचे दर  (Petrol-Diesel Prices), खाद्यतेलाचे दर (Edible Oil Rates), एलपीजी गॅस सिलेंडजरच्या किंमती (LPG Gas Cylinder)  यांच्या चढत्या आलेखाने सामान्यांच्या नाकीनऊ आणले आहेत. दरम्यान दिवाळीआधी पुन्हा एकदा एलपीजी गॅस सिलेंडरच्या किंमती वाढवण्याची घोषणा केली जाऊ शकते. त्यामुळे ऐन दिवाळीत नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या फटक्यात सामान्यांना एलपीजी गॅस सिलेंडर वाढीचा सामना करावा लागू शकतो. याआधी 6 ऑक्टोबर 2021 रोजी 14 किलोच्या घरगुती एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत 15 रुपयांची वाढ करण्यात आली होती. दरम्यान जुलै 2021 पासून आतापर्यंत LPG Gas Cylinder च्या दरात 90 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. LPG गॅस सिलेंडरची किंमत वाढवण्यामागे काय आहे कारण? एलपीजी सिलेंडरच्या खर्चापेक्षा कमी किमतीत विक्री केल्यामुळे होणारा तोटा 100 रुपये प्रति सिलेंडरवर पोहोचल्याचे सांगण्यात येत आहे. यामुळे, त्याच्या किमतीत वाढ जाहीर केली जाऊ शकते. एलपीजी सिलेंडरच्या दरात वाढ करण्याचा निर्णय सरकारच्या मान्यतेनंतर घेतला जाईल. हे वाचा-दिवाळीआधी येणार महागाई भत्त्याचा एरिअर, जाणून घ्या किती येणार वाढीव पगार? दरम्यान सरकारी पेट्रोलियम मार्केटिंग कंपन्यांना एलपीजी गॅसची किरकोळ किंमत खर्चानुसार निश्चित करण्याची मंजुरी केंद्र सरकारने दिली आहे. याशिवाय ही तफावत भरून काढण्यासाठी सरकारने आतापर्यंत कोणतेही अनुदान (lpg gas Subsidy) दिलेले नाही. अशा परिस्थितीत, आंतरराष्ट्रीय किमतीत वाढ झाल्याने एलपीजीच्या विक्रीतील तोटा 100 रुपयांवर पोहोचला आहे. काय आहे एलपीजी गॅस सिलेंडरची किंमत? ब्रेंट क्रूड ऑइलची किंमत प्रति बॅरल 85.42 डॉलरवर पोहोचली आहे. तर सौदी अरेबियामध्ये एलपीजीचा दर या महिन्यात 60 टक्क्यांनी वाढून 800 डॉलर प्रति टन झाला आहे. LPG ही सध्या एक नियमन केलेली वस्तू आहे. अशा परिस्थितीत, तांत्रिकदृष्ट्या सरकार त्याच्या किरकोळ किंमतीवर नियंत्रण ठेवू शकते. मात्र, या स्थितीत केंद्र सरकारला खर्चापेक्षा कमी किमतीत विक्रीचा तोटा भरून काढावा लागणार आहे. हे वाचा-एका वर्षात 'या' शेअरमध्ये 120 टक्क्यांहून अधिक रिटर्न, अजून 35% वाढ अपेक्षित आता देशाची राजधानी दिल्लीत घरगुती सिलेंडरचा दर 884.50 रुपयांवरून वाढून 899.50 रुपये प्रति सिलेंडर झाला आहे. मुंबईमध्ये देखील हाच दर आहे. कोलकातामध्ये एलपीजी गॅस सिलेंडर तब्बल 926 रुपयांनी विकला जात आहे. एकीकडे एलपीजी गॅस सिलेंडरचे दर वाढतायंत तर दुसरीकडे पेट्रोलने देखील देशातील महत्त्वाच्या शहरात शंभरी पार केली आहे. सध्या 18 हून जास्त राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात पेट्रोलचे दर 100 रुपये प्रति लीटरपेक्षा जास्त आहेत.
  Published by:Janhavi Bhatkar
  First published: