मराठी बातम्या /बातम्या /देश /

'ते काम होत नसेल तर बदली करून घ्या'; अमित शाहांनी काश्मीरमधील अधिकाऱ्यांना खडसावलं

'ते काम होत नसेल तर बदली करून घ्या'; अमित शाहांनी काश्मीरमधील अधिकाऱ्यांना खडसावलं

गृहमंत्र्यांनी शनिवारी त्यांच्या दौऱ्यात जम्मू-काश्मीरमधील सुरक्षा परिस्थितीचा आढावा घेतला आणि सुरक्षा अधिकाऱ्यांची बैठक घेतली.

गृहमंत्र्यांनी शनिवारी त्यांच्या दौऱ्यात जम्मू-काश्मीरमधील सुरक्षा परिस्थितीचा आढावा घेतला आणि सुरक्षा अधिकाऱ्यांची बैठक घेतली.

गृहमंत्र्यांनी शनिवारी त्यांच्या दौऱ्यात जम्मू-काश्मीरमधील सुरक्षा परिस्थितीचा आढावा घेतला आणि सुरक्षा अधिकाऱ्यांची बैठक घेतली.

  • Published by:  Kiran Pharate

नवी दिल्ली : गृहमंत्री अमित शहा जम्मू-काश्मीरच्या तीन दिवसांच्या दौऱ्यावरून (Amit Shah's Visit to Jammu Kashmir) परतले आहेत. 5 ऑगस्ट 2019 रोजी कलम 370 रद्द केल्यानंतर गृहमंत्री पहिल्यांदाच जम्मू-काश्मीरला पोहोचले होते. आपल्या तीन दिवसांच्या दौऱ्यात त्यांनी वरिष्ठ सुरक्षा अधिकार्‍यांच्या भेटीही घेतल्या. सूत्रांनी सीएनएन न्यूज 18 ला सांगितलं की, अमित शाह यांनी त्यांच्या दौऱ्यात थेट सुरक्षा अधिकाऱ्यांना जम्मू-काश्मीरमधील दहशतवाद (Terrorism in Jammu Kashmir) संपवण्यावर पूर्ण लक्ष केंद्रित करण्यास सांगितले.

गृहमंत्र्यांनी शनिवारी त्यांच्या दौऱ्यात जम्मू-काश्मीरमधील सुरक्षा परिस्थितीचा आढावा घेतला आणि सुरक्षा अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत त्यांच्यासोबत लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा, जम्मू-काश्मीर पोलीस, लष्कर, निमलष्करी दल आणि गुप्तचर यंत्रणांचे उच्च अधिकारी उपस्थित होते. नुकत्याच खोऱ्यातून अनेक नागरिकांच्या हत्येच्या घटना समोर आल्या असतानाच गृहमंत्र्यांचा हा दौरा झाला आहे.

Jammu Kashmir: चकमकीने उजडला सोमवार, 15 व्या दिवशीही सर्च ऑपरेशन

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या उच्चस्तरीय बैठकीत अमित शाह यांनी सर्वप्रथम गुप्तचर विभागाच्या प्रमुखांना संबोधित केले आणि जम्मू-काश्मीरमधील दहशतवादाला आळा घालण्यासाठी प्रभावी उपाययोजनांबाबत विचारणा केली. अधिका-यांनी गृहमंत्र्यांना त्यांच्या कार्यशैलीबद्दल सांगितले आणि गुप्तचरांनी दिलेल्या माहितीवर स्थानिक अधिकारी कारवाई करू इच्छित नाहीत असेही सांगितले. यावर, ज्या अधिकाऱ्यांना भीती वाटते त्यांनी काश्मीरमध्ये काम करू नये, त्याऐवजी दुसऱ्या ठिकाणी पोस्टिंग घ्यावे, अशी प्रतिक्रिया शाह यांनी दिल्याचे सूत्रांनी सांगितले.

शाहांनी हे केवळ एकदाच सांगितलं नाही तर दोनदा सांगून अशा अधिकाऱ्यांना ताबडतोब निघून जाण्यास सांगितलं असल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे. या दौऱ्यात शाह यांनी लष्कराच्या कमांडरशीही चर्चा केल्याचे सांगण्यात येत आहे. घुसखोरी सातत्याने कमी होत असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. 2021 मध्ये फक्त अकरा घुसखोरी झाल्या आहेत. त्यावर अमित शहांनी प्रत्युत्तर दिले की घुसखोरी अकराच असेल तर हत्याही कमी झाल्या पाहिजेत.

IND vs PAK मॅचदरम्यान अमित शहा पोहोचले भारत-पाक सीमेवरील बंकरमध्ये, पाहा VIDEO

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शाह म्हणाले की, जर फक्त अकरा घुसखोरी झाल्या असत्या, तर आतापर्यंत खोऱ्यातील दहशतवाद आणि लोकांच्या हत्येच्या घटना पूर्णपणे संपायला हव्या होत्या, जे झाले नाही. हे योग्य उत्तर आहे असे तुम्हाला वाटते का? असा सवाल त्यांनी अधिकाऱ्यांना केला. या बैठकीत जम्मू आणि काश्मीरचे लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा, जम्मू आणि काश्मीरचे मुख्य सचिव, डीजीपी काश्मीर, आयजी काश्मीर, इंटेलिजन्स ब्युरो आणि रॉचे प्रमुख आणि केंद्रीय गृहसचिव अजय भल्ला यांचा समावेश होता.

First published:

Tags: Amit Shah, Jammu and kashmir