बीजिंग, 20 मे : जगभरातील सर्व तज्ज्ञ, संशोधक, शास्त्रज्ञ गेल्या 3-4 महिन्यांपासून कोरोनावर लस शोधण्यासाठी दिवसरात्र मेहनत करत आहेत. मात्र अद्याप कोरोनावर लस शोधता आलेली नाही आहे. त्यामुळं आता बऱ्याच देशांनी गुणकारी औषध शोधण्यावर भर दिला आहे. असाच एक दावा आता काही शास्त्रज्ञांनी केला आहे. त्यांच्या मते ते तयार करत असलेले औषध लसीशिवाय कोरोनाचा नाश करू शकते. चीनमधील प्रयोगशाळेत असे औषध विकसित केले जात आहे ज्यामुळे कोरोनाव्हायरसचा प्रसार पूर्णपणे रोखला जाऊ शकतो. शास्त्रज्ञांचा असा दावा आहे की लसीशिवाय कोरोनावर उपचार करणे शक्य आहे. गेल्या वर्षीच्या अखेरीस चीनमधून कोरोनाचा जगभर प्रसार झाला. त्यानंतर जगभरातील देशांनी त्याचे उपचार आणि लस शोधण्यास सुरवात केली. संशोधकांचे म्हणणे आहे की चीनच्या प्रतिष्ठित पेकिंग युनिव्हर्सिटीच्या शास्त्रज्ञांद्वारे एका औषधाची चाचणी केली जात आहे. या औषधामुळं संक्रमित रुग्णांमध्ये कोरोनाचा प्रसार जास्त होणार नाही तसेच त्यांची प्रतिकारशक्तीही वाढू शकेल. वाचा- लसीशिवायच होणार Coronavirus चा नाश; WHO च्या माजी संचालकांचा दावा बीजिंग अँडव्हान्स इनोव्हेशन सेंटर फॉर जेनोमिक्सच्या संचालिका सुनिनी झी यांनी एएफपीला सांगितले की चाचणी टप्प्यातील हे औषध प्राण्यांवर यशस्वी झाले आहे. झी यांनी असेही सांगितले की, जेव्हा आम्ही संक्रमित उंदीरांमध्ये औषधांचे अँटिबायोटिक्स सोडले त्यानंतर पाच दिवसांनी कोरोनाचा शरीरातील प्रादुर्भाव कमी झाला. याचा अर्थ असा की या संभाव्य औषधाचा उपचारात्मक प्रभाव आहे. औषध करणार कोरोनावर संभाव्य उपचार हे औषध विषाणूची लागण होणाऱ्या पेशी थांबविण्यासाठी मानवी प्रतिरक्षा प्रणालीद्वारे निर्मित अँटीबॉडीजचा प्रसार रोखणारे अँटीबॉडीज वापरते. जे झी यांच्या टीमनं 60 रुग्णांच्या रक्तातून वेगळे केले होते. रविवारी सायंटिस्ट जर्नल सेलमध्ये प्रकाशित झालेल्या संशोधनावरील अभ्यासानुसार असे आढळले आहे की अँटीबॉडीज वापरल्याने रोगाचा संभाव्य उपचार होतो आणि पुनर्प्राप्तीची वेळ कमी होते. झी यांनी सांगितले की, त्यांची टीम अँटीबॉडीजसाठी रात्रंदिवस काम करत होती. त्या म्हणाले की, या वर्षाच्या अखेरीस आणि कोणत्याही थंड वातावरणात विषाणूचा संभाव्य प्रादुर्भाव रोखण्यासाठी हे औषध तयार आहे. वाचा- कोरोना व्हायरसला रोखणारं औषध सापडलं, चीनच्या लॅबोरेटरीचा दावा वाचा- खूशखबर! कोरोनाविरोधातील लसीच्या ह्युमन ट्रायलचा पहिला टप्पा यशस्वी
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.