जाहिरात
मराठी बातम्या / कोरोना / लसीशिवायच होणार Coronavirus चा नाश; WHO च्या माजी संचालकांचा दावा

लसीशिवायच होणार Coronavirus चा नाश; WHO च्या माजी संचालकांचा दावा

लसीशिवायच होणार Coronavirus चा नाश; WHO च्या माजी संचालकांचा दावा

Coronavirus विरोधात लोकांमध्ये अपेक्षेपेक्षा जास्त इम्युनिटी आहे, असं WHO च्या कॅन्सर प्रोग्रामचे माजी संचालक कॅरोल सिकोरा (Karol Sikora) यांनी म्हटलं आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

जिनिव्हा, 19 मे : कोरोनाव्हायरसपासून बचावासाठी इम्युनिटी मजबूत असणं गरजेचं आहे सांगितलं जातं आहे. काही तज्ज्ञ हर्ड इम्युनिटी म्हणजे सामूहिक संक्रमणाबाबत बोलत आहेत. या व्हायरसविरोधात लस कधी येईल याची प्रतीक्षा प्रत्येकाला आहे. अशात लसीशिवायच कोरोनाचा नाश होईल, असा दावा जागतिक आरोग्य संघटनेचच्या (WHO) माजी संचालकांनी केला आहे. लोकांमध्ये अपेक्षेपेक्षा जास्त इम्युनिटी आहे, असं त्यांनी म्हटलं आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या कॅन्सर प्रोग्रामचे माजी संचालक कॅरोल सिकोरा (Karol Sikora) यांनी कोरोनाव्हायरसबाबत एक ट्विट आहे. ज्यामध्ये त्यांनी मोठी माहिती दिली आहे. कॅरोल सिकोरा म्हणाले, “कोणतीही लस विकसित होण्याआधीच कोरोनाव्हायरसचा नैसर्गिकरित्या नाश होऊ शकतो. आपल्याला सर्वत्र एकसारखंच पॅटर्न दिसून येत आहे. मला वाटतं आपल्याकडे अपेक्षेपेक्षा जास्त रोगप्रतिकारक शक्ती आहे”

जाहिरात

“आपल्याला व्हायरसवर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे. मात्र तो आपोआपचं नष्ट होईल. असं माझं मत आहे, कारण व्यावहारिकदृष्ट्या असंच होतं आहे”, असंही ते म्हणाले. हे वाचा -  खूशखबर! कोरोनाविरोधातील लसीच्या ह्युमन ट्रायलचा पहिला टप्पा यशस्वी दरम्यान कोरोनाव्हायरसचा नाश करण्यासाठी हर्ड इम्युनिटी विकसित करावी लागेल, असं काही तज्ज्ञांनी म्हटलं आहे. हर्ड इम्युनिटी म्हणजे सामूहिक रोगप्रतिकारक क्षमता विकसित करणं. ज्यामध्ये जास्तीत जास्त लोकांना संक्रमित व्हावं लागेल. मात्र कोरोनाव्हायरसविरोधात हर्ड इम्युनिटी जीवघेणी ठरू शकते, असं जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटलं आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या आपत्कालीन विभागाचे संचालक माइक रेयान म्हणाले, “हर्ड इम्युनिटी हा शब्द प्राण्यांच्या आरोग्याशी संबंधित आहे. प्राण्यांच्या झुंडीत इम्युनिटी विकसित करण्यासाठी काही प्राण्यांचा जीव धोक्यात घातला जातो. मात्र माणसं जनावर नाहीत. त्यांच्या जीवाची जबाबदारी कोण घेईल? हर्ड इम्युनिटी लोकांच्या जीवसोबत खेळ होऊ शकतो” हे वाचा -  अमेरिकेच्या ‘बायो लॅब’मध्येच तयार झाला कोरोना व्हायरस, चीन आणि रशियाचा आरोप जागतिक आरोग्य संघटनेच्या टेक्निकल लीड मारिया वॅन यांनी सांगितलं की, “सध्या कोरोनाव्हायरसविरोधातील अँटिबॉडीजबाबतची परिस्थिती पाहता किती स्तरावर इन्युनिटी गरजेची आहे हे स्पष्ट नाही. त्यामुळे सध्या क्वारंटाइन आणि टेस्टींगच व्हायरसशी लढण्याचे उत्तम मार्ग आहेत” संकलन, संपादन - प्रिया लाड

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात