जाहिरात
मराठी बातम्या / विदेश / खूशखबर! कोरोनाविरोधातील लसीच्या ह्युमन ट्रायलचा पहिला टप्पा यशस्वी

खूशखबर! कोरोनाविरोधातील लसीच्या ह्युमन ट्रायलचा पहिला टप्पा यशस्वी

भारतात पुण्यासह काही शहरांमध्ये या चाचण्या सुरू असून सीरम इन्स्टिट्यूट या लशीचं उत्पादन करणार आहे.

भारतात पुण्यासह काही शहरांमध्ये या चाचण्या सुरू असून सीरम इन्स्टिट्यूट या लशीचं उत्पादन करणार आहे.

कोरोनाव्हायरसविरोधात मॉडर्ना इंक (Moderna Inc) कंपनीची लस यशस्वी ठरत असल्याचं दिसून आलं आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

वॉशिंग्टन, 18 मे : कोरोनाव्हायरसविरोधात लस (Coronavirus vaccine) कधी येईल याची प्रतीक्षा प्रत्येकाला आहे. जगभरात अनेक देशातील शास्त्रज्ञ लस विकसित करण्याचा प्रयत्न करत आहेत. काही लसींची चाचणी सुरू झाली आहे. त्यात आता अमेरिकेतल्या एका कंपनीने तयार केलेल्या लसीच्या चाचणीचा पहिला टप्पा यशस्वी झाला आहे. रॉयटर्स ने दिलेल्या वृत्तानुसार, अमेरिकेतल्या मॉडर्ना इंक कंपनीनं (Moderna Inc) तयार केलेल्या mRNA-1273 लसीची पहिली चाचणी यशस्वी झाली आहे. या लसीतील अँटिबॉडीज कोरोनाव्हारसला निष्क्रिय करत असल्याचं दिसून आलं आहे. हे वाचा -  अमेरिकेच्या ‘बायो लॅब’मध्येच तयार झाला कोरोना व्हायरस, चीन आणि रशियाचा आरोप नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ हेल्थनं केलेल्या अभ्यासात असं दिसून आलं की, कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांच्या रक्ताच्या नमुन्यातील अँटिबॉडीजप्रमाणेच ही लस दिलेल्या व्यक्तींच्या शरीरात अँटिबॉडीज तयार झाल्या. या अभ्यासात सहभागी झालेल्या व्यक्तींना तीन वेगवेगळे डोस देण्यात आले. या डोसनुसार व्हायरसशी लढण्यासाठी रोगप्रतिकारक क्षमता वाढत असल्याचं दिसून आलं. ही लस तयार करण्यासाठी व्हायरसचा वापर केलेला नाही तर कोरोनाचा जेनेटिक कोड तयार केला आहे. ही लस सुरक्षित असल्याचा दावा शास्त्रज्ञांनी केला आहे. आता पुढील चाचणी जुलैमध्ये करण्याचा कंपनीचा विचार आहे. हे वाचा -  X-ray मार्फत होऊ शकतं कोरोनाव्हायरसचं निदान; खर्च आणि वेळही वाचणार काही दिवसांपूर्वीच जागतिक आरोग्य संघटनेचे (WHO) महासंचालक टेड्रॉस अ‍ॅडॅनॉम यांनी लवकरच कोरोनावर लस मिळेल असं सांगितलं होतं. संयुक्त राष्ट्रांच्या आर्थिक आणि सामाजिक परिषदेला त्यांनी ही माहिती दिली होती.  टेड्रॉस यांच्या म्हणण्यानुसार बर्‍याच देशांनी मदतीचा हात पुढे केला आहे आणि सुमारे 100 वेगवेगळ्या टीम लसीची चाचणी घेत आहेत आणि त्यातील 8 लसीचा शोध घेण्याच्या अगदी जवळ आले आहेत. सध्या एकूण 7 ते 8 टीम ही लस तयार करण्याच्या अगदी जवळ आहे आणि लवकरच जगाला एक चांगली बातमी मिळेल, असं ते म्हणाले होते. संकलन, संपादन - प्रिया लाड

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात