Home /News /videsh /

कोरोना व्हायरसला रोखणारं औषध सापडलं, चीनच्या लॅबोरेटरीचा दावा

कोरोना व्हायरसला रोखणारं औषध सापडलं, चीनच्या लॅबोरेटरीचा दावा

मात्र आता रशियात सर्व सामान्यांसाठी ही लस उपलब्ध होणार असल्याने त्याच्या प्रयोग आणि निष्कर्षांकडे सर्व जगाचं लक्ष लागलं आहे.

मात्र आता रशियात सर्व सामान्यांसाठी ही लस उपलब्ध होणार असल्याने त्याच्या प्रयोग आणि निष्कर्षांकडे सर्व जगाचं लक्ष लागलं आहे.

हे औषध उंदीराला दिल्यानंतर त्याच्यात कोरोनाला रोखणाऱ्या Antibody’s तयार झाल्यात. त्यामुळे हा प्रयोग यशस्वी ठरला आहे असा दावा करण्यात येत आहे.

    बीजिंग 19 मे: जगभर धुमाकूळ घालणाऱ्या कोरोनाव्हायरसला रोखण्यासाठी जगभर संशोधन सुरू आहे. अनेक देशांनी संशोधनात निर्णयाक प्रगती केल्याचा दावा केला आहे. असं असतानाच चीनच्या एका लॅबोरेटरीनेही कोरोनाला रोखणारं औषध तयार केल्याचा दावा केला आहे. जगप्रसिद्ध पेकिंग युनिव्हर्सिटीच्या संशोधन करणाऱ्या लॅबोरेटरीने हा दावा केला आहे. जानेवारी महिन्यात या औषधाचं परिक्षण करण्यात आलं होतं ते यशस्वी ठरलं असा दावाही या लॅबच्या तज्ज्ञांनी केला आहे. AFP ने याबाबतचं वृत्त दिलं आहे. या लॅबचे प्रमुख सॅन झी यांनी सांगितलं की या औषधाचा प्रयोग उंदरावर करण्यात आला होता. तो यशस्वी ठरला आहे. हे औषध उंदीराला दिल्यानंतर त्याच्यात कोरोनाला रोखणाऱ्या Antibody’s तयार झाल्यात. त्यामुळे हा प्रयोग यशस्वी ठरला आहे. कोरोना व्हायरसवर अजुन औषध सापडलेलं नाही. मात्र या औषधामुळे व्हायरसला रोखता येतं असा त्यांचा दावा आहे. शरीरात Antibody’s तयार झाल्यामुळे पेशी अतिशय चांगल्या पद्धतीने कोरोना व्हायरसचा मुकाबला करू शकतात. त्यामुळे रुग्ण लवकरातलवकर बरा होण्याची शक्यता असतो. जगभर अशा पद्धतीने Antibody’s तयार करण्यासाठीही संशोधन सुरू आहे. Lockdownनंतर लहान मुलांची होईल भयानक अवस्था; नोबेल विजेत्यांनी व्यक्त केली चिंता कोरोना व्हायरसमुळे सगळं जग हादरून गेलं आहे. जगातल्या 190 देशांमध्ये कोरोनाने थैमान घातलं आहे. कोरोनाची सुरुवात ही चीनमध्ये झाली असल्याने सर्व जगातून चीनवर आरोप होत आहे आणि सांशकतेनेही बघितलं जात आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी तर उघडपणे हा चायना व्हायरस असल्याचं म्हटलं आहे. आणि सातत्याने चीनवर आरोपही केले आहेत. '30 दिवसात सुधारा नाहीतर...', डोनाल्ट ट्रम्प यांनी WHOला पत्राद्वारे दिली धमकी आता चीन आणि रशियाने एकत्र येत अमेरिकेवर पलटवार केलाय. अमेरिकेच्या 'बायो लॅब'मध्येच हा व्हायरस तयार झाल्याचा आरोप या देशांनी केला असून खळबळ उडवून दिली आहे. या लॅब्सच्या चौकशीची मागणीही त्यांनी केल्याने नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. अमेरिका सातत्याने चीनवर आरोप करत असल्याने त्याला उत्तर देण्यासाठी चीनने पूर्ण तयारी केली आहे. त्याच्या मदतीला रशिया आणि इराणही आल्याने आता संशयाचं भूत अमेरिकेविरुद्ध उभं करण्याचा या देशांचा प्रयत्न आहे. जगभर पसरलेल्या अमेरिकेच्या 'बायो लॅब'मध्ये हा व्हायरस तयार करण्यात आल्याचा आरोप या देशांनी केलाय.
    Published by:Priyanka Gawde
    First published:

    पुढील बातम्या