मराठी बातम्या /बातम्या /विदेश /

IS चे दहशतवादी आता महिला नोकरदारांना करतायत टार्गेट? अफगाणिस्तानात 3 महिला पत्रकारांची वेगवेगळ्या ठिकाणी हत्या

IS चे दहशतवादी आता महिला नोकरदारांना करतायत टार्गेट? अफगाणिस्तानात 3 महिला पत्रकारांची वेगवेगळ्या ठिकाणी हत्या

Terrorism in Afganistan: अफगाणिस्तानमध्ये तीन महिला पत्रकारांची  (Women Reporter Murder in Afganistan) वेगवेगळ्या ठिकाणी हत्या करण्यात आली आहे.

Terrorism in Afganistan: अफगाणिस्तानमध्ये तीन महिला पत्रकारांची (Women Reporter Murder in Afganistan) वेगवेगळ्या ठिकाणी हत्या करण्यात आली आहे.

Terrorism in Afganistan: अफगाणिस्तानमध्ये तीन महिला पत्रकारांची (Women Reporter Murder in Afganistan) वेगवेगळ्या ठिकाणी हत्या करण्यात आली आहे.

  • Published by:  News18 Desk
काबुल, 03 मार्च: गेल्या अनेक वर्षांपासून अफगाणिस्तानला दहशतवादाच्या (Terrorism In Afganistan) झळा बसल्या आहेत. अफगाणिस्तानातील आतंकवादाचं हे सत्र सुरूच आहे. अलीकडेच आतंकवाद्यांनी अफगाणिस्तान सर्वोच्च न्यायालयाच्या (Supreme court) दोन महिला न्यायाधिशांची (Two women justice murder) भर रस्त्यात गोळ्या झाडून हत्या केली होती. अफगाणिस्तानातील दहशतवाद्यांनी पुन्हा तीन महिला पत्रकारांची हत्या (Women Reporter Murder in Afganistan) केली आहे. त्यामुळे सार्वजानिक क्षेत्रात नोकऱ्या करणाऱ्या महिलांच्या जीविताचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. पूर्व अफगाणिस्तानमध्ये स्थानिक रेडिओ आणि टीव्ही वृत्तवाहिनासाठी काम करणार्‍या तीन महिलांच्या हत्येची जबाबदारी इस्लामिक स्टेट (IS) या दहशतवादी संघटनेने स्वीकारली आहे. मंगळवारी उशिरा IS ने या हल्ल्यांची जबाबदारी स्वीकारली आहे. असं असलं तरी अफगाण सरकारने या हल्ल्यांसाठी तालिबान्यांना जबाबदार धरलं आहे. गेल्या काही महिन्यांपासून युद्धग्रस्त भागात लोकांच्या ठार मारण्याच्या घटनांत वाढ होताना दिसत आहे. बुधवारी या तिन्ही  मृत महिला पत्रकारांवर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. खासगी वाहिनीचे वृत्त संपादक आणि नंगरहार प्रांतातील अधिकाऱ्यांनी सांगितलं की, या तिन्ही पत्रकार महिलांना वेगवेगळ्या ठिकाणी गोळ्या घालण्यात आल्या आहेत. तर अफगाण अधिकाऱ्यांनी सांगितलं की, तीन पत्रकार महिला हत्याकांड प्रकरणात एका संशयित आरोपीला अटक केली असून कारी बसर असं त्याचं नाव आहे. हे ही वाचा - भारताशेजारील देशातील घटना; सुप्रीम कोर्टाच्या 2 महिला न्यायाधिशांची हत्या तबिलान प्रवक्त्याने नाकारला अफगाण सरकारचा दावा पोलिसांनी सांगितलं की, बसर हा तालिबानी दहशतवादी आहे, परंतु तालिबानचे प्रवक्ते झबीहुल्ला मुजाहिद यांनी हा दावा फेटाळला आहे. नंगरहारचे पोलीस प्रमुख जनरल झुमा गुल हेमत यांनी सांगितलं की, हल्ल्यांसाठी वापरल्या गेलेल्या पिस्टलमध्ये संशयित आरोपी बसरने सायलेन्सर बसवला होता. या हल्ल्यानंतरच्या काही तासांतच पोलिसांनी आरोपी कारी बसरला जलालाबाद येथून अटक केली आहे. हे ही वाचा - Vienna terror attack: 20 वर्षांच्या हल्लेखोरासह 14 जण अटकेत, ISIS ने घेतली हल्ल्याची जबाबदारी महिला पत्रकारांना का लक्ष्य केलं? या महिला पत्रकारांची हत्या का केली? याचं उत्तरही IS ने दिलं आहे. त्यांनी म्हटलं की, अफगाण सरकारने धर्माचा त्याग केला आहे. अशा सरकारशी निष्ठा असणार्‍या मीडिया वाहिनीत या महिला पत्रकार काम करत होत्या. त्यामुळे त्यांची हत्या केल्याची कबुली इसिसने दिली आहे. यापूर्वीही डिसेंबरमध्ये या वृत्तवाहिनीत काम करणार्‍या मलाला मैवांद या महिला पत्रकाराची हत्या करण्यात आली होती. या हत्येची जबाबदारीही देखील आयसिसने स्वीकारली आहे.
First published:

Tags: Afghanistan, Murder, Terrorism

पुढील बातम्या