Vienna terror attack: 20 वर्षांच्या हल्लेखोरासह 14 जण अटकेत, ISIS ने घेतली हल्ल्याची जबाबदारी

Vienna terror attack: 20 वर्षांच्या हल्लेखोरासह 14 जण अटकेत, ISIS ने घेतली हल्ल्याची जबाबदारी

ऑस्ट्रियाच्या व्हिएन्ना शहरात झालेल्या दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी ISIS ने घेतली आहे.

  • Share this:

व्हिएन्ना, 04 नोव्हेंबर : युरोपियन देश ऑस्ट्रियाच्या व्हिएन्ना शहरात झालेल्या दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी ISIS ने घेतली आहे. या हल्ल्याची जबाबादारी घेत असल्याचा एक व्हिडीओ देखील जारी करण्यात आला आहे. ऑस्ट्रियामधील व्हिएन्ना शहरात झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 5 जणांचा मृत्यू आणि 22 जण जखमी झाले आहेत. मंगळवारी पोलिसांनी अनेक ठिकाणी छापे टाकून 14 जणांना अटक केली. या सर्व लोकांचा इस्लामिक कट्टरपंथी संघटनेशी संबंध असल्याचा संशय आहे. यापैकी बहुतेक लोकांनी व्हिएन्नाच्या रस्त्यावर गोळीबार करणाऱ्या जिहादी दहशतवाद्यांना मदत केल्याचा आरोप आहे. या हल्ल्याची जबाबदारी इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनेने घेतली आहे.

या व्हिडीओमध्ये दहशतवाद्याने आपलं नाव अबू दुजाना असल्याचं सांगितलं असून हल्ल्याची जबाबदारी ISISने घेतली आहे. त्याने हल्ल्याआधी इन्स्टाग्रामवर व्हिडीओ शेअर केला आणि त्यानंतर आपण ISIS समर्थक असल्याची कबुली दिली आहे.

युरोपियन देश ऑस्ट्रियाच्या (Austria) व्हिएन्ना शहरात (Vienna terror attack) दहशतवादी हल्ल्या झाला. येथील यहुदी मंदिरासह 6 वेगवेगळ्या ठिकाणी सशस्त्र लोकांनी गोळीबार केला. सीएनएनच्या म्हणण्यानुसार ऑस्ट्रियाचे सरकार हा नियोजित दहशतवादी हल्ला असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता. त्यानुसार याची जबाबादारी आता ISIS ने घेतल्यानंतर पोलिसांनी त्या दिशेनं तपासाची सूत्र हलवली आहेत.

हे वाचा-ट्रम्प यांच्या मुलाचे प्रताप, जगाचा नकाशा शेअर करत काश्मीर दाखवला पाकिस्तानात

रॉयटर्सनं दिलेल्या वृत्तानुसार एका दहशतवाद्याची ओळख पटली आहे. या दहशतवाद्याचे नाव कुझतीम फेजुलाई असे वर्णन केले जात आहे. हा 20 वर्षांचा आहे. हा हल्लेखोर ऑस्ट्रियामध्येच मोठा झाला आहे आणि अटक केलेल्या लोकांकडून कुठल्याही परदेशी व्यक्तीची नोंद झाली नाही. हा माणूस उत्तर मेसोडेनियाचा असल्याचे सांगितले जाते. ऑस्ट्रियामधील हल्ल्यानंतर फ्रान्स, जर्मनी आणि स्पेनमध्येही धार्मिक स्थळे आणि शाळांची सुरक्षा वाढविण्यात आली आहे.

Published by: Kranti Kanetkar
First published: November 4, 2020, 9:22 AM IST
Tags:

ताज्या बातम्या