व्रेक्सहॅम, 5 एप्रिल : एका कंपनीच्या मालकानं 98 लाख रुपयांचे घर विकत घेतलं आहे, जेणेकरून युक्रेनमधील निर्वासित (Ukrainian Refugees) कुटुंबांना राहण्यासाठी जागा देता येईल. या घरात जो कोणी राहील, त्याला कोणतेही पैसे द्यावे लागणार नाहीत, असं त्यांचं म्हणणं आहे. इथं राहणं पूर्णपणे विनामूल्य असेल. लवकरच या घरात एक कुटुंब रहायला येणार आहे. डेलीमेलच्या वृत्तानुसार, 50 वर्षीय जेमी ह्यूज (Jamie Hughes) यांची रशियन हल्ल्यानंतर युक्रेनमधील निर्वासित कुटुंबांना मदत करायची इच्छा आहे. अशा परिस्थितीत त्यांनी यूकेच्या नॉर्थ वेल्सजवळील व्रेक्सहॅममध्ये (Wrexham) 3 बेडरूमचं घर विकत घेतलं. जेमी यांनी वयाच्या 21 व्या वर्षी टेलिकॉम कंपनी सुरू केली. त्यांच्या घरात लवकरच एका युक्रेनियन आईसह तिची तीन मुलं येणार आहेत. जेमी म्हणाले, ‘मला अशा लोकांना मदत करायची होती. कारण, लाखो लोक घर सोडून जाताना पाहून मला धक्का बसला.’ पहिल्यांदा घर बांधण्याचा विचार मनात आला जेमी यांना आधी वाटलं की, आपण अशा गरजू लोकांसाठी आपल्या घराजवळ एक वेगळी इमारत बांधू. पण नंतर त्याला खूप वेळ लागेल, हे त्यांच्या लक्षात आलं. जेमी यांच्या म्हणण्यानुसार, याला किमान दोन वर्षं लागली असती. त्यानंतर जेमी यांनी अनेक घरं पाहिली. त्यानंतर यापैकी त्यांनी एक घर विकत घेतलं. हे वाचा - श्वानाची मालकाप्रती असलेली निष्ठा पाहून ग्रामस्थही भारावले! 8 महिने उपाशी राहत केलं घराचं संरक्षण
युक्रेनियन कुटुंब लवकरच येईल
आता तीन मुलांची आई मारिया सध्या या घरात राहणार आहे. त्यांना तीन मुलं असून त्यांचं वय 10, 12 आणि 14 वर्षं आहे. डेलीमेलच्या वृत्तानुसार, मारिया युक्रेनमधील एका हॉस्पिटलमध्ये काम करतात. त्या सध्या पश्चिम युक्रेनमध्ये असून पोलंडमधील निर्वासित शिबिरात जाण्याच्या तयारीत आहेत. येत्या आठवड्यात त्या ब्रिटनला येतील, अशी मारियाला आशा आहे. सध्या त्या व्हिसाच्या मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे. हे वाचा - IIT गुवाहाटीचं इलेक्ट्रिक वाहनांसाठी नवीन तंत्रज्ञान, हवामानानुसार मिळणार फायदे फेसबुक ग्रुपद्वारे मदत मारियाची कौटुंबिक मैत्रीण ज्युली सिमकिन्स यांनी त्यांला या घरापर्यंत पोहोचण्यास मदत केली. ‘Wrexheim and Ukraine United’ या फेसबुक ग्रुपवरून त्यांना या घराची माहिती मिळाली. ज्युलीनं सांगितलं की, या ग्रुपचे लोक सोफा, बेड आणि वॉशिंग मशिनही दान करत आहेत.