मराठी बातम्या /बातम्या /देश /

श्वानाची मालकाप्रती असलेली निष्ठा पाहून ग्रामस्थही भारावले! 8 महिने उपाशी राहत केलं घराचं संरक्षण

श्वानाची मालकाप्रती असलेली निष्ठा पाहून ग्रामस्थही भारावले! 8 महिने उपाशी राहत केलं घराचं संरक्षण

Ballia News: कुत्रा (Dog) किती प्रामाणिक असतो, याचा प्रत्यय उत्तर प्रदेश मधील एका घटनेने आला आहे. या कुत्र्याने आठ महिने अन्नपाण्याविना आपल्या मालकाच्या घराचं रक्षण केलंय.

Ballia News: कुत्रा (Dog) किती प्रामाणिक असतो, याचा प्रत्यय उत्तर प्रदेश मधील एका घटनेने आला आहे. या कुत्र्याने आठ महिने अन्नपाण्याविना आपल्या मालकाच्या घराचं रक्षण केलंय.

Ballia News: कुत्रा (Dog) किती प्रामाणिक असतो, याचा प्रत्यय उत्तर प्रदेश मधील एका घटनेने आला आहे. या कुत्र्याने आठ महिने अन्नपाण्याविना आपल्या मालकाच्या घराचं रक्षण केलंय.

    बलिया, उत्तर प्रदेश 4 एप्रिल : कुत्रा (Dog) हा प्राणी अत्यंत इमानदार आणि संवेदनशील (Sensitive) मानला जातो. कितीही कठीण प्रसंग आला तरी तो आपल्या मालकाचं रक्षण करतो. उत्तर प्रदेशात (Uttar Pradesh) नुकत्याच घडलेल्या घटनेतून ही गोष्ट अधोरेखित होते. मालक निघून गेल्यानंतर आठ महिन्यांपासून घरात बंद असलेल्या कुत्र्यानं प्रसंगी उपाशी राहून मालकाच्या घराचं संरक्षण केलं. अखेरीस त्याचा संयम सुटला. पोलिसांनी (Police) शेजाऱ्यांच्या मदतीनं या कुत्र्याला घराबाहेर काढलं. या कुत्र्याचा संयम आणि मालकाप्रती असलेली निष्ठा सध्या ग्रामस्थांमध्ये चर्चेचा विषय ठरला आहे. उत्तर प्रदेशातल्या बलिया जिल्ह्यातला एक कुत्रा निष्ठा आणि इमानदारीचा आदर्श ठरला आहे. जर्मन शेफर्ड (German Shepherd Dog) जातीच्या जेनी (Jenny) या कुत्र्याने 8 महिने अन्नपाण्याविना आपल्या मालकाच्या घराचं रक्षण केलं. दरम्यान, संयमाची परिसीमा संपल्यानं तो रात्रीच्या वेळी अनेकदा रडायचा. हा प्रकार अनेक दिवस सुरू होता. अखेर रविवारी शेजाऱ्यांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर घराच्या गेटचं कुलूप तोडून या कुत्र्याला बाहेर काढण्यात आलं आणि पोलिस त्याला सोबत घेऊन गेले. सध्या हा कुत्रा पोलिस ठाण्यात (Police Station) असून, त्याच्या अन्न-पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. OMG: पोलीस हवालदाराला मोकाट बैलानं उचलून आपटलं, हल्ल्याचा VIDEO Viral बांसडीहरोड परिसरातील रघुनाथपूर (बेला) गावातल्या अभिषेक पाल (Abhishek Pal) यांच्या कुटुंबीयांनी जर्मन शेफर्ड जातीचं जेनी हे कुत्रं पाळलं आहे. सुमारे आठ महिन्यांपूर्वी या कुत्र्याच्या भरवशावर कुटुंबीय घर सोडून कुठेतरी गेले होते. घराला आणि गेटला कुलूप असल्यानं जेनीला कुठेही बाहेर जाता येत नव्हतं. कुत्र्यांचं भुंकणं (barking of dog) ऐकून घरात कोणीही नसल्याचं आजूबाजूच्या लोकांना कळालं. त्यामुळे ते कधीतरी दिवसभरात चपातीचे तुकडे घरात टाकत असत. शेजाऱ्यांनी दिलेल्या अन्नावर जेनी कसाबसा जगत होता आणि आपल्या मालकाच्या घराचं संरक्षण करत होता. `रात्र झाली की कंपाउंडमध्ये बंद असलेला जेनी रडायचा,` असं ग्रामस्थांनी सांगितलं. याबाबत एसओ वीरेंद्र मिश्र म्हणाले,`` ग्रामस्थांच्या समक्ष या घराच्या मुख्य गेटचं कुलूप तोडून कुत्र्याला बाहेर काढण्यात आलं आहे. त्यानंतर लोकांच्या उपस्थितीत गेटला दुसरं कुलूप लावण्यात आलं आहे. घराच्या आवारात कोंडून ठेवल्यानं या कुत्र्याची भूक आणि तहानेनं अवस्था बिकट झाली होती. मानवतेच्या दृष्टिकोनातून त्याला ग्रामस्थांच्या उपस्थितीत बाहेर काढण्यात आलं आहे. सध्या या कुत्र्याला पोलीस ठाण्यात ठेवून त्याच्या जेवण आणि पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे,`` असं वीरेंद्र मिश्र यांनी स्पष्ट केलं.
    First published:

    Tags: Dog, Uttar pardesh

    पुढील बातम्या