जाहिरात
मराठी बातम्या / देश / IIT गुवाहाटीचं इलेक्ट्रिक वाहनांसाठी नवीन तंत्रज्ञान, हवामानानुसार मिळणार फायदे

IIT गुवाहाटीचं इलेक्ट्रिक वाहनांसाठी नवीन तंत्रज्ञान, हवामानानुसार मिळणार फायदे

IIT गुवाहाटीचं इलेक्ट्रिक वाहनांसाठी नवीन तंत्रज्ञान, हवामानानुसार मिळणार फायदे

सध्या बाजारात उपलब्ध असलेली इलेक्ट्रिक वाहनं देखील भारतातील विविध हवामान परिस्थितीनुसार किंवा त्या परिस्थितीशी मिळतीजुळती नाहीत. आयआयटी गुवाहाटीचे संचालक टी. जी. सीताराम म्हणतात की, आयआयटी गुवाहाटीचे संशोधक या दिशेनं खूप गांभीर्यानं काम करत आहेत.

  • -MIN READ
  • Last Updated :

गुवाहाटी, 5 एप्रिल : इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT), गुवाहाटी (Indian Institute of Technology (IIT), Guwahati) यांनी एक तंत्रज्ञान विकसित केलं आहे, जे इलेक्ट्रिक वाहनांच्या मोटर्स, बॅटरीज आणि मूळ उपकरण निर्माते (Original Equipment Manufacturers - OEMs) यांना रेटिंग देतं. IIT गुवाहाटीच्या मते, हा एक प्रकारचा दृष्टीकोन आहे, जो भारताच्या गरजेनुसार (Indian Drive-cycles) इलेक्ट्रॉनिक वाहनांचं मानकीकरण करतो. टेलिग्राफ इंडियाच्या वृत्तानुसार, आतापर्यंत संशोधकांनी भारतीय गरजांचा विचार केला नव्हता. सध्या बाजारात उपलब्ध असलेली इलेक्ट्रिक वाहनं देखील भारतातील विविध हवामान परिस्थितीनुसार किंवा त्या परिस्थितीशी मिळतीजुळती नाहीत. आयआयटी गुवाहाटीचे संचालक टी. जी. सीताराम म्हणतात की, आयआयटी गुवाहाटीचे संशोधक या दिशेनं खूप गांभीर्यानं काम करत आहेत. याची भविष्यात, वातावरणातून कार्बन कमी करण्यात आणि देशाच्या शाश्वत विकासात महत्त्वाची भूमिका राहील. हे वाचा -  …तर भारताचीही अवस्था श्रीलंकेसारखी होईल, वरिष्ठ अधिकाऱ्यांचा इशारा सध्या, कोणतेही OEM हे तंत्रज्ञान वापरत नाहीत आणि ते भारतीय वाहनांच्या ड्राइव्ह-सायकल डेटा मिळावा यासाठी विनंती करत आहेत. आयआयटी गुवाहाटीला आशा आहे की, त्यांच्या संशोधनाचा या क्षेत्राला फायदा होईल. स्टार्ट-अपसाठीही ते फायदेशीर ठरेल आणि कार्बन उत्सर्जन आणि इंधनाचा वापर कमी करणं हा या संशोधनाचा उद्देश आहे. पहिल्यांदाच विकसित झालंय तंत्रज्ञान IIT गुवाहाटीच्या इलेक्ट्रिक मोबिलिटी प्रयोगशाळेतील संशोधकांनी, इन्स्टिट्यूटच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी विभागातील प्राध्यापक प्रवीण कुमार यांच्या नेतृत्वाखाली, ग्रामीण आणि शहरी दोन्ही भागांसाठी भारतीय हवामान परिस्थितीवर अभ्यास सुरू केला आहे. सध्या IIT गुवाहाटीनं केलेलं संशोधन इतर कोठेही उपलब्ध नाही. हे वाचा -  या PHOTO मागची कहाणी वाचून डोळ्यात पाणी येईल; अनेकांसाठी ठरलीये प्रेरणा! दमट भागासाठी विकसित केलेली इलेक्ट्रॉनिक ड्राईव्हट्रेन, कोरड्या एनएस थंड वातावरणात समान कार्य करत नाही. त्यामुळे, OEM सध्या भारतीय परिस्थितीसाठी एक मानक ड्राइव्ह-सायकल बनवण्याचा विचार करत आहेत. भारताच्या विविध हवामानाशी जुळवून घेणार्‍या अधिक कार्यक्षम ड्राईव्हट्रेन तयार करण्यासाठी OEM सह काम करणाऱ्या व्यावसायिक वाहनांपर्यंत संशोधनाचा विस्तार करण्याचा संस्थेचा मानस आहे. चारचाकी वाहनांसाठी हे तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी संशोधक काम करत आहेत. मात्र, सध्याचा प्रकल्प केवळ दुचाकी वाहनांवर केंद्रित आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात