काबूल, 17 ऑगस्ट : तालिबानने (Taliban) काबूलसह (Kabul) जवळपास सर्वच भागांवर आपला कब्जा मिळवल्यानंतर अफगाणिस्तान (Afghanistan) देशातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. तेथील लोक आपलाच देश सोडून पळून जाण्याचा प्रयत्न करत आहेत. रविवारी अफगाणिस्तानातून पलायन करण्यासाठी हजारोंच्या संख्येने लोक काबूल विमानतळावर पोहोचले होते. कसंही करुन या देशातून बाहेर पडण्यासाठी ते अतिशय जीवघेणा प्रवास करतानाचे काही भयंकर व्हिडीओ समोर आले. अफगाणिस्तानचे नागरिक मिळेल त्या मार्गाने देश सोडण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र तालिबानने अफगाणिस्तानच्या सर्व सीमांवर ताबा मिळवला असल्याने, देशाबाहेर पडण्यासाठी हवाईमार्ग हा एकमेव पर्याय उरला. त्यामुळे मोठ्या संख्येने लोकांची काबूल विमानतळावर गर्दी झाली. परंतु काबूलवर ताबा मिळवल्याने विमानांची उड्डाणेही रद्द झाली. काबूल इंटरनॅशनल एयरपोर्टवर (Kabul International Airport) कमर्शियल फ्लाइट्सची (Flights) उड्डाण थांबवण्यात आल्याची माहिती आहे. यातच एका नागरिकाचा काबूल विमानताळावर प्रवेश करतानाचा व्हिडीओ समोर आला आहे.
जीव वाचण्यासाठी विमानाच्या इंजिनवर बसून प्रवास, टेक ऑफ करताच खाली पडले अफगाणी: पाहा Live Video
एक नागरिक काबूल विमानातळावर एका भल्यामोठ्या भिंतीवरुन विमानतळावर येण्यासाठी प्रयत्न करताना दिसतो. मात्र खाली उभा असलेला तालिबानी त्या व्यक्तीवर गोळ्या झाडतो (Talibani Shoot Citizen). यात त्याला गोळी लागत नाही, परंतु तालिबानीच्या अशा कृत्यानंतर तो व्यक्ती पुन्हा भिंतीच्या पलीकडे जाताना व्हिडीओमध्ये दिसतंय.
A Taliban fighter is shooting on a man trying to enter #Kabul Airport.#Afghanistan pic.twitter.com/NU6Nq3fT6B
— Miraqa Popal (@MiraqaPopal) August 16, 2021
काबूलच्या एअरपोर्टवर झाली मुंबई लोकलसारखी परिस्थिती; विमानात चढण्यासाठी नागरिकांची झुंबड, VIDEO
दरम्यान, रविवारी काबूल विमानतळावर नागरिकांची देशाबाहेर जाण्यासाठी झुंबड उडाली होती. अनेक जण विमानात जागा नसल्याने विमानाच्या टपावर, विमानाच्या थेट इंजिनालाच लटकून प्रवास करत असल्याचं समोर आलं. अफगाणिस्तानातील परिस्थिती अतिशय बिकट झाली असून तालिबान्यांचं मोठं वर्चस्व निर्माण झालं आहे. अफगाणिस्तानचे राष्ट्रपती अशरफ गनी (Afghan President Ashraf Ghani) यांनीही देश सोडला आहे.