मराठी बातम्या /बातम्या /विदेश /तालिबान अमेरिकन सैन्य सोडून गेलेली शस्त्रं पाकिस्तानला पाठवतोय, भारताविरुद्ध कटाचा धोका?

तालिबान अमेरिकन सैन्य सोडून गेलेली शस्त्रं पाकिस्तानला पाठवतोय, भारताविरुद्ध कटाचा धोका?

अफगाणिस्तानातील शस्त्र विक्रेते ही शस्त्रे तालिबानींकडून विकत घेत आहेत. पाक-अफगाण सीमेवरील दुकानांमध्ये त्यांची खुलेआम विक्री सुरू आहे. अफगाणिस्तानातून पाकिस्तानमार्गे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत अंमली पदार्थांचीही वाहतूक केली जाते. हा माल मोठ्या प्रमाणात दक्षिण आशियाई देशांमध्ये पोहोचतो.

पुढे वाचा ...

काबूल, 14 एप्रिल : अफगाणिस्तानमध्ये (Afghanistan) तालिबानकडून (taliban) पाकिस्तानला (pakistan) शस्त्रे पुरवल्याचा आरोप केला जात आहे. ज्या शस्त्रास्त्रांची तस्करी केली जात आहे, ती भारताविरुद्ध सीमापार चकमकींमध्ये वापरली जाऊ शकतात. तसंच ती दहशतवाद्यांच्या हाती पडण्याचाही धोका आहे. तालिबानने सातत्याने आता ते अधिक चांगले तालिबान बनले असल्याचा आग्रह धरला आहे.

ऑगस्ट 2021 मध्ये अफगाणिस्तानातून बाहेर पडल्यानंतर अमेरिकेची बरीच शस्त्रे तिथे शिल्लक होती. यातील बहुतांश शस्त्रे अक्षम (disable) करण्यात आली आहेत. मात्र, काही शस्त्रे अजूनही कार्यक्षम आहेत. काबूल ताब्यात घेतल्यानंतर अमेरिकेची शस्त्रे तालिबानच्या हाती लागली.

हे वाचा - श्रीलंकेच्या स्थितीवरून समजून घ्या, देश दिवाळखोर कसे होतात?

वृत्तानुसार, अफगाणिस्तानातील शस्त्र विक्रेते ही शस्त्रे तालिबानी शस्त्रधारी टोळ्यांकडून विकत घेत आहेत आणि पाक-अफगाण सीमेवरील दुकानांमध्ये त्यांची खुलेआम विक्री करत आहेत. अफगाणिस्तानातून पाकिस्तानात फळे आणि भाजीपाला घेऊन जाणाऱ्या ट्रकमधून या शस्त्रांची तस्करी केली जात आहे.

हे वाचा - रशिया युक्रेन युद्धामुळे अमेरिकेचं जगातील स्थान बदलणार का? काय आहे चीनचा प्लॅन?

अफगाणिस्तानातून पाकिस्तानमार्गे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत अंमली पदार्थांचीही वाहतूक केली जाते. पाकिस्तान आणि अफगाणिस्तानच्या दरम्यान सुमारे 2400 किलोमीटरची सीमा आहे. तेथून खैबर पख्तुनख्वामध्ये ड्रग्जची वाहतूक केली जाते. येथून ड्रग्ज लाहोर आणि फैसलाबाद येथे नेले जाते. त्यानंतर हा माल मोठ्या प्रमाणात कराचीमार्गे दक्षिण आशियातील बाजारपेठेत पोहोचतो.

First published:
top videos

    Tags: Afghanistan, Pakistan, Taliban