मराठी बातम्या /बातम्या /विदेश /'सर्वात महत्त्वाचा देश', तालिबानला भारतासोबत हवेत चांगले संबंध; NSAच्या बैठकीबाबत केलं महत्त्वाचं विधान

'सर्वात महत्त्वाचा देश', तालिबानला भारतासोबत हवेत चांगले संबंध; NSAच्या बैठकीबाबत केलं महत्त्वाचं विधान

भारताचे NSA अजित डोवाल  (Ajit Doval) यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक झाली. ज्यामध्ये 7 देशांचे सुरक्षा सल्लागार/सचिव उपस्थित होते.

भारताचे NSA अजित डोवाल (Ajit Doval) यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक झाली. ज्यामध्ये 7 देशांचे सुरक्षा सल्लागार/सचिव उपस्थित होते.

भारताचे NSA अजित डोवाल (Ajit Doval) यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक झाली. ज्यामध्ये 7 देशांचे सुरक्षा सल्लागार/सचिव उपस्थित होते.

काबूल, 12 नोव्हेंबर: अफगाणिस्तानमध्ये (Afghanistan) सत्ताधारी असलेल्या तालिबानने (Taliban) भारत देशाला या क्षेत्रातील सर्वात महत्त्वाचा देश (Most Important Country) असं म्हटलं आहे. त्याचवेळी, तालिबानचं म्हणणे आहे की, त्यांना भारत सरकारशी (Indian government) चांगले राजनैतिक संबंध हवे आहेत. यादरम्यान तालिबाननं अफगाणिस्तानसंदर्भात भारतात झालेल्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (NSA) स्तरावरील बैठकीबाबतही चर्चा केली. बुधवारी, भारताचे NSA अजित डोवाल (Ajit Doval) यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक झाली. ज्यामध्ये 7 देशांचे सुरक्षा सल्लागार/सचिव उपस्थित होते.

प्रवक्ता जबीउल्लाह मुजाहिद (Zabihullah Mujahid) म्हणाले की, "आम्ही बैठकीला उपस्थित नसलो तरी ही परिषद अफगाणिस्तानच्या हिताची होती, असा आम्हाला विश्वास आहे." कारण अफगाणिस्तानातील सध्याच्या परिस्थितीचा संपूर्ण प्रदेश विचार करत आहे आणि त्यात सहभागी असलेल्या देशांनी अफगाणिस्तानातील सुरक्षा व्यवस्था सुधारण्यासाठी आणि सध्याच्या सरकारला स्वतःहून सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी मदत करण्याचा विचार केला असेल.

हेही वाचा- Pune: अंध पतीच्या डोळ्यात फेकली धूळ; 7 महिने संसार करत लाखोंचा घातला गंडा

यादरम्यान, प्रवक्त्याने पुन्हा एकदा पुनरुच्चार केला की 'अफगाणिस्तानच्या इस्लामिक अमिरातीच्या धोरणा'नुसार, त्यांची भूमी कोणत्याही देशाविरुद्ध वापरली जाणार नाही. त्यांना परस्पर सहकार्य हवे आहे, असेही ते म्हणाले.

10 नोव्हेंबर रोजी झालेल्या परिषदेनंतर भारत सरकारने अफगाणिस्तानला मानवतावादी मदत देण्यास वचनबद्ध असल्याचे सांगितले होते. दरम्यान भारत अजूनही रस्त्यानं अफगाणिस्तानला अन्नधान्य पोहोचवण्यासाठी पाकिस्तानच्या मंजुरीची वाट पाहत आहे. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयानं म्हटलं होतं की, अफगाणिस्तानातील लोकांना भारताचा पाठिंबा अगदी स्पष्ट आहे. आम्ही अनेक वर्षांपासून अफगाणिस्तानातील लोकांना मदत करत आहोत. गेल्या काही महिन्यांपासून परिस्थिती कठीण झाली आहे.

हेही वाचा- मित्राच्या वाढदिवसाला गेले अन्...; दुर्दैवी घटनेत जीवलगानं डोळ्यादेखत तडफडत सोडला प्राण 

या बैठकीत इराण, किर्गिस्तान, रशिया, ताजिकिस्तान, तुर्कमेनिस्तान, उझबेकिस्तान या सात देशांचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आणि सचिव सहभागी होते. बुधवारी झालेल्या बैठकीत डोवाल म्हणाले की, आज या बैठकीचं आयोजन करणं भारतासाठी विशेष अभिमानाची बाब आहे. आम्ही अफगाणिस्तानातील घडामोडींवर बारीक लक्ष ठेवून आहोत. त्याचा परिणाम केवळ अफगाणिस्तानातील लोकांवरच होणार नाही, तर त्याच्या शेजारी आणि प्रदेशावरही होईल. मला विश्वास आहे की आमची चर्चा अफगाण लोकांना आणि आमच्या सुरक्षेला मदत करेल.

First published:
top videos

    Tags: Afghanistan, Taliban