जळगाव, 12 नोव्हेंबर: जळगावपासून जवळच असणाऱ्या नशीराबाद याठिकाणी एक हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. मित्राचा वाढदिवस साजरा (3 friends went for birthday celebration) करण्यासाठी गेलेल्या तिघांवर काळाने घाला घातला आहे. वाढदिवस साजरा करून परत येत असताना, तीन तरुणांच्या दुचाकीला एका वाळूच्या डंपरने जोरदार धडक (sand dumper hit two wheeler) दिली आहे. या अपघातात एकाचा जागीच मृत्यू (1 friend died) झाला आहे. तर अन्य दोघं गंभीर जखमी झाले असून एकाची प्रकृती चिंताजनक आहे. नशीराबाद येथील सुनसगाव रोडवर हा भीषण अपघात झाला आहे.
विशाल उर्फ विकी रमेश रंधे असं मृत पावलेल्या 25 वर्षीय तरुणाचं नाव आहे. तर रोहित दगडू इंगळे ( वय 25) आणि उदय भगवान बोदळे (वय 23) असं गंभीर जखमी झालेल्या अन्य दोन मित्रांची नावं आहेत. संबंधित सर्वजण नशीराबाद येथील सिद्धार्थनगर परिसरातील रहिवासी आहेत. संबंधित तिघेही आपल्या एका मित्राचा वाढदिवस साजरा करण्यासाठी गेले होते. वाढदिवस साजरा केल्यानंतर, तिघेही आपल्या दुचाकीने घरी येत होते. दरम्यान नशीराबाद येथील सुनसगाव रोडवर सुसाट वेगाने आलेल्या वाळूच्या डंपरने तिघांनाही जोरदार धडक मारली आहे.
हेही वाचा-Social Mediaवरील मित्राकडून मुलीवर बलात्कार; 7 महिन्यांपासून सुरू होता अत्याचार
या दुर्दैवी अपघातात विशाल उर्फ विकी रमेश रंधे याचा जागीच मृत्यू झाला आहे. तर रोहित दगडू इंगळे याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. जखमी रोहितवर आयसीयूमध्ये उपचार सुरू असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. तर उदय बोदळे हा या अपघातातून थोडक्यात बचावला आहे. तो किरकोळ जखमी झाला असून त्याच्यावरही उपचार सुरू आहे. एकाच घटनेत तीन जीवलग मित्रांसोबत अशी विचित्र घटना घडल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
हेही वाचा-दिवाळीसाठी आजोळी आला अन्...; बीडमध्ये एकुलत्या एक मुलाचा दुर्दैवी अंत
अपघाताची माहिती समोर येताच तिघांच्या नातेवाईकांनी आणि मित्रपरिवारांनी रुग्णालयात धाव घेतली आहे. मृत विशालच्या कुटुंबीयांनी तर रुग्णालयाच्या आवारातच आक्रोश केला आहे. या अपघाताची माहिती पोलिसांना देण्यात आली आहे. या अपघाताबाबत अधिक तपास पोलीस करत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime news, Death, Jalgaon