Home /News /pune /

Pune: अंध पतीच्या डोळ्यात फेकली धूळ; 7 महिने संसार करत लाखोंचा घातला गंडा

Pune: अंध पतीच्या डोळ्यात फेकली धूळ; 7 महिने संसार करत लाखोंचा घातला गंडा

Crime in Pune: पुण्यातील एका अंध व्यक्तीची तब्बल 9 लाख रुपयांची फसवणूक (9 lakh fraud with blind man) झाल्याची घटना समोर आली आहे.

    पुणे, 12 नोव्हेंबर: पुण्यातील एका अंध व्यक्तीची तब्बल 9 लाख रुपयांची फसवणूक (9 lakh fraud with blind man) झाल्याची घटना समोर आली आहे. अंध व्यक्तीशी लग्न करणाऱ्या नवरीनं आणि लग्न जुळवणाऱ्या मध्यस्थींनी ही फसवणूक केली आहे. याप्रकरणी विमानतळ पोलीस ठाण्यात पाच जणांविरोधात गुन्हा दाखल (FIR lodged) केला आहे. आरोपी पत्नी घरातील दागिने आणि पैसे घेऊन फरार झाली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत. विनोद केसाराम चौधरी असं 30 वर्षीय फिर्यादीचं नाव असून ते विमाननगर परिसरातील रेशमा रिव्हेरा सोसायटीतील रहिवासी आहेत. फिर्यादी चौधरी हे दोन्ही डोळ्यांनी अंध असून ते रिझर्व बँक ऑफ इंडियामध्ये (RBI) काम करतात. दोन्ही डोळ्यांनी अंध असल्याने त्यांचं लग्न जुळण्यात अनेक अडचणी येत होत्या. अनेक ठिकाणी मुली शोधूनही त्याचं लग्न जुळत नव्हतं. हेही वाचा-पत्नीचा पाठलाग करत भररस्त्यात केले सपासप वार; थरारक घटनेनं मुंबई हादरली! दरम्यान, फिर्यादींच्या समाजातील मध्यस्थ कैलासकुमार सिंघवी यांनी विनोद चौधरी यांच्यासाठी सारिका बंब नावाच्या मुलीचं स्थळ आणलं. तसेच लग्नासाठी मुलीच्या कुटुंबीयांसाठी पैसे द्यावे लागतील, असं सिंघवी यांनी फिर्यादीस सांगितलं. त्यानुसार, फिर्यादीनं आरोपींना वेळोवेळी 8 लाख 73 हजार रुपये दिले. आरोपी पत्नी सारीका बंब हिने लग्नानंतर सात महिने फिर्यादीसोबत संसारही केला. पण त्यानंतर आरोपी महिलेनं लग्नात दिलेले दागिने आणि 20 हजार रुपयांची रोकड घेऊन पळ काढला आहे. हेही वाचा-Social Mediaवरील मित्राकडून मुलीवर बलात्कार; 7 महिन्यांपासून सुरू होता अत्याचार पत्नी अचानक घरातून गायब झाल्यामुळे फिर्यादी विनोद चौधरी यांनी पत्नी सारीकाला फोन केला. मी थोड्याच दिवसात परत येते असं आश्वासन पत्नीने दिलं. काही दिवस वाट पाहूनही पत्नी आली नाही. त्यामुळे त्यांनी पुन्हा पत्नी सारीकाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. पण यावेळी आरोपी महिलेनं आपला फोन बंद करून ठेवला होता. संबंधित महिलेचं आधारकार्ड तपासले असता, तेही बनावट निघालं आहे. आपली फसवणूक झाल्याचं लक्षात आल्यानंतर, चौधरी यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात 5 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. संबंधित प्रकार जानेवारी 2021 ते जुलै 2021 दरम्यान घडला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Crime news, Marriage, Money fraud, Pune

    पुढील बातम्या