जाहिरात
मराठी बातम्या / विदेश / चिंता वाढली! तालिबाननं दहशतवादी अहंगरची केली तुरुंगातून मुक्तता; भारतावरील अनेक हल्ल्यांमध्ये होता सहभागी

चिंता वाढली! तालिबाननं दहशतवादी अहंगरची केली तुरुंगातून मुक्तता; भारतावरील अनेक हल्ल्यांमध्ये होता सहभागी

चिंता वाढली! तालिबाननं दहशतवादी अहंगरची केली तुरुंगातून मुक्तता; भारतावरील अनेक हल्ल्यांमध्ये होता सहभागी

तुरुंगातून सुटलेला हा दहशतवादी जम्मू -काश्मीरमध्ये (Jammu Kashmir) भारतीय सुरक्षा यंत्रणांविरोधात लढत राहिलेला आहे आणि दहशतवादी हल्ल्यांतही त्याचा सहभाग आहे

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली 20 सप्टेंबर : अफगाणिस्तानातून अमेरिकन सैन्याने माघार घेतल्याने (US Withdraws From Afghanistan) आता तिथे तालिबानचे (Taliban in Afghanistan) राज्य स्थापन झाले आहे. तालिबानने अफगाणिस्तान ताब्यात घेतल्यापासून ते तुरुंगात असलेल्या कुख्यात दहशतवाद्यांना (Terrorist) सोडण्यात सतत गुंतलेले आहेत. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ISKP चा आणखी एक कुख्यात दहशतवादी एजाज अहंगार जो अफगाणिस्तानच्या तुरुंगात होता, त्याला तुरुंगातून सोडण्यात आलं आहे. BREAKING : भाजपच्या माजी मंत्र्याने घरात गळफास घेऊन केली आत्महत्या तुरुंगातून सुटलेला हा दहशतवादी जम्मू -काश्मीरमध्ये (Jammu Kashmir) भारतीय सुरक्षा यंत्रणांविरोधात लढत राहिलेला आहे आणि दहशतवादी हल्ल्यांतही त्याचा सहभाग आहे. हा दहशतवादी मूळचा पीओकेचा रहिवासी आहे, पण त्याने जम्मू -काश्मीरमध्येही घुसखोरी केली होती आणि काश्मीरच्या स्वातंत्र्यासाठी तो लढत आहे. पाकिस्तानच्या ड्रोन हल्ल्यात तत्कालीन ISKP प्रमुख हुझैफा ठार झाल्यानंतर ISKP ची कमांड, विशेषत: जम्मू -काश्मीरमध्ये दहशतवादी कारवाया करण्यासाठी असलम फारुकी ISKP च्या हातात देण्यात आली. त्यालाही अफगाणिस्तानच्या बग्राम तुरुंगातून सोडलं गेलं. आता तालिबानने ISKP दहशतवादी एजाज अहंगरला पाकिस्तान ISI च्या सांगण्यावरून सोडून दिले आहे. तालिबान जम्मू-काश्मीरमध्ये पाय पसरण्याच्या प्रयत्नात आहे. तालिबानला मदत करण्यासाठी पाकिस्तान सरकार आणि त्याच्या गुप्तचर यंत्रणांनीही एक योजना तयार केली. मात्र, भारत आता तालिबानवर बारीक नजर ठेवून आहे. भारत पूर्णपणे सतर्क आहे आणि आता देशाच्या सीमेवर तैनात असलेल्या सुरक्षा दलांना तालिबानचा सामना करण्यासाठी विशेष प्रशिक्षणही दिले जात आहे. पंजाबमध्ये राजकीय नाट्याला नवे वळण, चरणजीत सिंह चन्नी नवे मुख्यमंत्री! या योजनेमध्ये, दहशतवादी संघटना ISKP अर्थात इस्लामिक स्टेट खुरासान प्रोव्हिंसच्या आडून पुन्हा एकदा भारतात दहशतवादी हल्ला घडवण्याचा कट रचला जात आहे. पाकिस्तान ISI आणि तालिबान यांनी यासाठी ISKP चा प्रमुख असमल फारुकी याला अफगाणिस्तानच्या बग्राल तुरुंगातून मुक्त केलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात