• Home
 • »
 • News
 • »
 • national
 • »
 • BREAKING : पंजाबमध्ये राजकीय नाट्याला नवे वळण, चरणजीत सिंह चन्नी नवे मुख्यमंत्री!

BREAKING : पंजाबमध्ये राजकीय नाट्याला नवे वळण, चरणजीत सिंह चन्नी नवे मुख्यमंत्री!


 Charanjit Singh Channi new CM of Punjab : चरणजीत सिंह चन्नी हे मुख्यमंत्री होणार अशी घोषणा पंजाब काँग्रेसचे प्रभारी हरीश रावत यांनी ट्वीटद्वारे केली.

Charanjit Singh Channi new CM of Punjab : चरणजीत सिंह चन्नी हे मुख्यमंत्री होणार अशी घोषणा पंजाब काँग्रेसचे प्रभारी हरीश रावत यांनी ट्वीटद्वारे केली.

Charanjit Singh Channi new CM of Punjab : चरणजीत सिंह चन्नी हे मुख्यमंत्री होणार अशी घोषणा पंजाब काँग्रेसचे प्रभारी हरीश रावत यांनी ट्वीटद्वारे केली.

 • Share this:
  पंजाब, 19 सप्टेंबर : पंजाबमध्ये कॅप्टन अमरिंदर सिंग (Captain Amarinder Singh)यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यामुळे राजकीय सत्तासंघर्ष निर्माण झाला होता. दोन दिवसांपासून मुख्यमंत्रिपदाच्या रस्सीखेच अखेर आज थांबली आहे.  चरणजीत सिंह चन्नी ((Charanjit Singh Channi) यांच्या गळ्यात मुख्यमंत्रिपदाची माळ पडली आहे. काँग्रेसच्या हायकमांडकडून चरणजीत सिंह चन्नी यांच्या नावाची अधिकृत घोषणा केला आहे. (Charanjit Singh Channi new CM) पंजाबमध्ये गेल्या दोन दिवसांपासून राजकीय घडामोडींना वेग आला होता. अनेक नावं मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत होती. पण, अखेर आज काँग्रेसच्या हायकमांडने सर्व आमदारांची सहमती घेऊन चरणजीत सिंह चन्नी यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलंआहे. काँग्रेस महासचिव केसी वेणुगोपाल यांनी बैठक घेतली होती. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. IPL 2021, MI vs CSK : चेन्नईचा एकटा खेळाडू मुंबईवर भारी, ठोकल्या 200 सिक्स चरणजीत सिंह चन्नी आज संध्याकाळी 6.30 वाजता राज्यपालांना भेटायला जाणार आहे. उद्या 20 तारखेसाठी ते राज्यपालांकडे भेटीसाठी वेळ मागणार असल्याची शक्यता आहे. चरणजीत सिंह चन्नी हे मुख्यमंत्री होणार अशी घोषणा  पंजाब काँग्रेसचे प्रभारी हरीश रावत यांनी ट्वीटद्वारे केली. आतापर्यंत सुखजिंदर सिंह रंधावा यांचं नाव मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत होतं. पण, अखेरच्या क्षणी चरणजीत सिंह चन्नी यांच्या नावाची घोषणा केली. MMRDA Recruitment: मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण इथे 'या' पदांसाठी भरती चरणजीत सिंह चन्नी हे चमकौर साहिब मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले होते. चरणजीत सिंह हे दलित समाजाचे प्रतिनिधीत्व करताय. विशेष म्हणजे, चरणजीत सिंह चन्नी हे कॅप्टन अमरिंदर सिंह यांचे विरोधक राहिले आहे. दोन उपमुख्यमंत्री असणार? दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार,  पंजाबमध्ये दोन उपमुख्यमंत्री असणार अशी शक्यता आहे. अरुणा चौधरी आणि भारत भूषण आशु यांना उपमुख्यमंत्रिपदी नेमण्यात येणार असल्याचं बोललं जात आहे. पंजाबमधील काँग्रेस आमदारांसोबत चर्चा केली आहे.  अंबिका सोनी यांची राहुल गांधी यांची दिल्लीत बैठक सुरू असून लवकरच मुख्यमंत्रिपदाची अधिकृत घोषणा करण्यात येईल.
  Published by:sachin Salve
  First published: