काबुल, 31 ऑगस्ट : अफगाणिस्तानमध्ये (Afghanistan) तालिबानची (Taliban) सत्ता आल्यानंतर क्रौर्याचे (Cruelty) वेगवेगळे नमुने समोर यायला सुरुवात झाली आहे. इस्लाममध्ये संगीताला परवानगी (Music prohibited) नसल्याचं सांगत तालिबानने अफगाणिस्तानातील लोकप्रिय गायकाला (Singer) घराबाहेर ओढत आणृन त्याची हत्या (Murder) केली. या घटनेमुळे तालिबानच्या क्रूरतेचा पुन्हा एकदा नागरिकांना अंदाज आला असून 20 वर्षांपूर्वीच्या तालिबानी सत्तेच्या आठवणी जाग्या झाल्या आहेत. अशी केली हत्या अफगाणिस्तानमधील सुप्रसिद्ध लोकगायक फवाद अंदाराबी यांची शुक्रवारी काबुलच्या उत्तर भागात डोक्यात गोळी घालून हत्या करण्यात आली. त्यांचा दोष एवढाच होता की ते गायक होते. गेली अनेक वर्षं ते गाणं गाऊन तालिबानी नागरिकांचं मनोरंजन करत होते. मात्र इस्लाममध्ये संगीत मान्य नसल्याचं सांगत तालिबानने फवाद यांची डोक्यात गोळी घालून हत्या केली. अफगाणिस्तानचे माजी गृहमंत्री मसूद अंदाराबी यांनी ट्विटरवरून या घटनेची माहिती दिली असून तालिबानच्या पाशवी कृत्याबद्दल खेद व्यक्त केला आहे. फवाद हे लोकांचं मनोरंजन करण्याचं चांगलं काम करत होते. मात्र तालिबाननं त्यांचा खून केल्याचा आरोप मसूद यांनी केला आहे. हे वाचा - तालिबानच्या क्रौर्याची परिसीमा, हेलिकॉप्टरला प्रेत टांगून शहरातून फिरवले जाग्या झाल्या जुन्या आठवणी अफगाणिस्तानमध्ये 1996 ते 2000 या काळात तालिबानचं सरकार होतं. त्यावेळी पूर्ण देशात संगीतावर बंदी घालण्यात आली होती. संगीत हे इस्लामविरोधी असल्याचं सांगत कुठल्याही माध्यमातून संगीताचे स्वर कानावर पडणार नाहीत, असा कायदाच तालिबानने केला होता. यावेळी तसाच कायदा करणार का, असा प्रश्न पत्रकारांनी तालिबानच्या प्रवक्त्यांना विचारला होता. त्यावेळी तसा कायदा केला नाही, तरी लोक गाण्यापासून परावृत्त होतील, असं काहीतरी करू, असं उत्तर तालिबाननं दिलं होतं. मात्र गायकाची हत्या झाल्यामुळे तालिबानचा खरा चेहरा उघड झाल्याची टीका होत असून गायकाच्या मृत्यूबाबत हळहळ व्यक्त होत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.