कंदाहार, 31 ऑगस्ट : अफगाणिस्तानमध्ये (Afghanistan) सत्ता (Power) प्रस्थापित केल्यानंतर तालिबाननं (Taliban) आपल्या क्रौर्याची (Cruelty) परिसीमा दाखवायला सुरुवात केली आहे. अमेरिकी बनावटीच्या हेलिकॉप्टरला (Helicopter) एक प्रेत (Dead body) टांगून तालिबाननं ते कंदाहार शहरावरून फिरवून आणलं. या कृतीतून तालिबाननं नागरिकांना संदेश दिला असून अमेरिकेची मदत करणाऱ्यांना माफ केलं जाणार नसल्याचा इशारा दिला आहे.
If this is what it looks like… the Taliban hanging somebody from an American Blackhawk… I could vomit. Joe Biden is responsible.
— Liz Wheeler (@Liz_Wheeler) August 30, 2021
https://t.co/muHLEi3UvK
दहशतीचं वातावरण तालिबानची सत्ता आल्यानंतर अफगाणिस्तानमध्ये कमालीची दहशत पसरली आहे. तालिबानचा बालेकिल्ला मानला जाणाऱ्या कंदाहारमध्ये अमेरिकी हेलिकॉप्टरमधून तालिबाननं एक मृतदेह टांगून फेरफटका मारला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अमेरिकेला मदत केल्याच्या संशयावरून या नागरिकांनी त्याची हत्या केली आणि त्याचा मृतदेह लांब दोरीच्या साहाय्याने हेलिकॉप्टरला बांधून बाहेर सोडला. या घटनेचं अनेकांनी मोबाईलवरून व्हिडिओ शूटिंग केलं. अंतर अधिक असल्यामुळे लटकावलेल्या व्यक्तीचा चेहरा दिसू शकला नाही. ती व्यक्ती जिवंत आहे की मृत आहे, असा प्रश्नदेखील अनेकांना पडला. मात्र स्थानिक पत्रकारांनी दिलेल्या माहितीनुसार या व्यक्तीची अगोदर हत्या करण्यात आली आणि त्यानंतर त्याचा मृतदेह हेलिकॉप्टरला लटकवण्यात आला. हे वाचा - अमेरिकेच्या माघारीनंतर तालिबानने दाखवले रंग, पंजशीरवर चढवला हल्ला, रक्तपात सुरू ब्लॅक हॉक हेलिकॉप्टर या व्हिडिओनंतर नेटिझन्सनी संताप व्यक्त केला असून अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. मुळात हे अमेरिकेचं ब्लॅक हॉक हेलिकॉप्टर आहे. ते उडवण्याचं प्रशिक्षण तालिबानी फायटर्सना कसं मिळालं, असा सवाल अऩेकजण उपस्थित करत आहेत. हे हेलिकॉप्टर नेमकं कोण उडवत होतं, असा सवालही विचारला जात आहे. अमेरिकेनं सैन्य माघारी बोलावण्याचा निर्णय हा अमानवी आणि अफगाणी नागरिकांच्या मानवी अधिकारांची पायमल्ली करणारा होता, अशी प्रतिक्रिया अनेक नागरिक व्यक्त करत आहेत. यापूर्वीदेखील अफगाणिस्तानच्या सैन्याची अनेक उपकरणं आणि वाहनं यावर तालिबाननं ताबा मिळवल्याचे व्हिडिओज प्रसिद्ध झाले आहेत.