मराठी बातम्या /बातम्या /विदेश /

तालिबाननं आणखी तीन शहरांवर मिळवला ताबा; दीड लाख लोकांची होरपळ

तालिबाननं आणखी तीन शहरांवर मिळवला ताबा; दीड लाख लोकांची होरपळ

तालिबाननं कंधार, गझनी, हेरात अशा महत्त्वाच्या शहरांवर आपला ताबा मिळवला आहे. (File Photo)

तालिबाननं कंधार, गझनी, हेरात अशा महत्त्वाच्या शहरांवर आपला ताबा मिळवला आहे. (File Photo)

Taliban Afghanistan War: अफगाणिस्तानची वाढती धगधग लक्षात घेत, भारतानं मंगळवारीच आपल्या नागरिकांना अफगाणिस्तानातून मायदेशी परतण्याच्या सूचना दिल्या आहेत.

  • Published by:  News18 Desk

काबुल, 11 ऑगस्ट: अमेरिकेनं आपलं सैन्य माघारी (American Army Went Back) घेतल्यापासून अफगाणिस्तानात तालिबानी (Taliban) संघटनेच्या हिंसक घटना वाढल्या आहेत. तालिबानच्या वाढत्या नियंत्रणामुळे अफगाणिस्तानातील परिस्थिती बिकट बनत चालली आहे. तालिबान शहरापाठोपाठ शहरं काबीज करत आहे. तालिबाननं मंगळवारी आणखी तीन शहरं (Taliban Control Over 3 More Cities) काबीज केली आहे. तालिबाननं पुल-ए-खुमरी, फैजाबाद आणि फराह अशी तीन शहरं आपल्या ताब्यात घेतली आहेत. यानंतर आता तालिबानची नजर येथील चौथ्या क्रमांकाचं शहर मजार-ए-शरीफवर आहे. लवकरच हेही शहर तालिबानच्या ताब्यात जाण्याची शक्यता आहे.

अफगाणिस्तानची वाढती धगधग लक्षात घेत, भारतानं मंगळवारीच आपल्या नागरिकांना अफगाणिस्तानातून मायदेशी परतण्याच्या सूचना दिल्या आहेत. युद्धग्रस्त भागातून आपल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी भारतानं एक विशेष विमानही अफगाणिस्तानला पाठवलं आहे. तालिबानच्या भीतीमुळे आतापर्यंत देशातील सुमारे 1 लाख 54 हजार लोकं बेघर झाले आहेत. त्यांना आपला जीव मुठीत घेऊन इतरत्र पलायन करण्याची वेळ आली आहे.

हेही वाचा-भारतानं बनवलेल्या महामार्गावर तालिबानचा ताबा; 300 दशलक्ष डॉलरची गुंतवणूक धोक्यात

ही शहरं तालिबाननं केली काबीज

तालिबाननं यापूर्वीच देशातील सहा प्रांताच्या राजधान्या आपल्या ताब्यात घेतल्या आहे. ज्यामध्ये समांगन प्रांत, कुंदुज, सर-ए-पोल, तलोकान यांचा समावेश आहे. त्याचबरोबर इराणच्या सीमेलगत असणाऱ्या निम्रोझ प्रांताची राजधानी झरांज आणि उझबेकिस्तान आणि तुर्कमेनिस्तानच्या सीमेला लागून असलेल्या नोवझान प्रांताची राजधानी शबरघानवरही तालिबाननं ताबा मिळवला आहे.

हेही वाचा- 'आम्हाला एकटं सोडू नका', राशिद खानचं जागतिक नेत्यांना कळकळीचं आवाहन

22 हजाराहून अधिक कुटुंबीयांवर स्थलांतर होण्याची वेळ

कंधार शहरावर तालिबाननं हल्ला केल्यानंतर अफगाणिस्तानातील 22 हजाराहून अधिक लोकांना आपली घरं सोडावी लागली आहेत. साडेसहा लाख लोकसंख्या असलेलं कंधार शहर काबूल नंतर देशातील दुसरं सर्वात मोठं शहर आहे. मे महिन्यापासून अफगाणिस्तानात हिंसाचाराच्या घटनांत प्रचंड वाढ झाली आहे. अमेरिकन सैन्या पूर्णपणे परत गेल्यानंतर तालिबाननं हल्ले करायला सुरुवात केली होती.

First published:

Tags: Afghanistan, Taliban