मुंबई, 11 ऑगस्ट : अफगाणिस्तानमधील परिस्थिती सध्या गंभीर बनली आहे. तालिबानी दहशतवादी आणि सैन्यात जोरदार युद्ध सुरु आहे. तालिबाननं देशातील अनेक भागावर वर्चस्व प्रस्थापित केलं आहे. आता या दहशतवाद्यांचं लक्ष्य मोठी शहरं आहेत. अफगाणिस्तानमधील 80 टक्के भागावर तालिबान्यांची सत्ता असून देशात सध्या यादवी युद्ध सुरु आहे. अमेरिकेनं सैन्य मागे घेतल्यानंतर देशातील परिस्थिती झपाट्यानं खालावली आहे. या सर्व परिस्थितीनंतर अफगाणिस्तानचा क्रिकेटपटू राशिद खाननं (Rashid Khan) जगभरातील नेत्यांना कळकळीचं आवाहन केलं आहे.
अफगाणिस्तान क्रिकेटचा मुख्य चेहरा असलेल्या राशिद खाननं त्याच्या ट्विटर अकाऊंटवरुन एक भावुक पोस्ट शेअर केली आहे. 'जगभरातील नेत्यांनो, माझा देश अडचणीत आहे. मुलं आणि महिलांसह रोज हजारो निर्दोष नागरिक शहीद होत आहेत. घरं आणि संपत्ती नष्ट करण्यात येत आहे. या चकमकींमुळे हजारो कुटंबं विस्थापित झाले आहेत. या संकटात आम्हाला एकटं सोडू नका. अफगाणिस्तानी लोकांना मारणे बंद करा. अफगाणिस्तानला नष्ट करु नका. आम्हाला शांतता हवी आहे.'
Dear World Leaders! My country is in chaos,thousand of innocent people, including children & women, get martyred everyday, houses & properties being destructed.Thousand families displaced.. Don’t leave us in chaos. Stop killing Afghans & destroying Afghaniatan🇦🇫. We want peace.🙏
— Rashid Khan (@rashidkhan_19) August 10, 2021
'या' टीममधील भारतीय क्रिकेटपटू घेत आहेत लष्कराकडून प्रशिक्षण, पाहा VIDEO
अफगाणिस्तानमधील यादवी युद्धात महिला आणि मुलांना मोठ्या प्रमाणात लक्ष्य करण्यात आले आहे. मुलांना जबरदस्तीनं अतिरेकी संघटनांमध्ये भरती करण्यात येत आहे. संयुक्त राष्ट्राच्या युनिसेफ या संस्थेचे अफगाणिस्तान प्रतिनिधी हर्वे लुडोविच यांनी दिलेल्या माहितीनुसार, 'गेल्या 72 तासांमध्ये 20 मुलांचा मृत्यू झाला आहेत. तर 130 जण जखमी झाले आहेत. गेल्या महिनाभरात अफगाणिस्तानीत किमान 35 हजार कुटुंब बेघर झाले आहेत, असा यूएनएचसीआर या संस्थेचा अंदाज आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Afghanistan, Cricket news, World news