काबूल, 10 सप्टेंबर: अफगाणिस्तानात सरकारची घोषणा केल्यानंतर तालिबाननं (Taliban) आपलं खरं रुप दाखवण्यास सुरुवात केली आहे. तालिबानच्या गृह मंत्रालयाने (Home ministry) देशात निदर्शनांवर बंदी घातली आहे. त्याचवेळी, तालिबानी संस्कृती विभागाकडून असं म्हटलं गेलं आहे की, महिलांना खेळांमध्ये भाग घेण्याची परवानगी दिली जाणार नाही.
दरम्यान तालिबाननं हवेत गोळीबार सुरू ठेवला. मात्र अफगाणिस्तानच्या महिलांनी काबुलच्या रस्त्यावर निदर्शनं करणं सुरूच ठेवलं. अनेक ठिकाणी महिलांच्या निदर्शनांमुळे तालिबानी सैनिकांची तारांबळही उडाली. त्यामुळे हे सर्व तालिबानींना इतके त्रासदायक झालं की त्यांनी आता निदर्शनांवर बंदी घातली आहे.
दहशतवादी यादीत समाविष्ट असलेल्या सिराजुद्दीन हक्कानी यांच्या नेतृत्वाखालील गृह मंत्रालयाने म्हटलं आहे की, यावेळी कोणत्याही व्यक्तीने कोणत्याही प्रकारचे निदर्शने करू नये. तुम्हाला निषेध करायचा असल्यास आधी न्याय मंत्रालयाची परवानगी घ्यावी लागेल. निदर्शनाचं कारण, ठिकाण, वेळ, त्यात वापरलेले बॅनर आणि लावण्यात येणाऱ्या घोषणांचं कारण द्यावं लागेल.
सुरक्षा दलाची झाली चूक, माओवादी समजून निष्पापांना झाडल्या गोळ्या; 8 वर्षांनंतर खुलासा
निदर्शनासाठी ही वेळ आणि वातावरण नाही, असं तालिबान मंत्री जबीबुल्ला मुजाहिद म्हणालेत. कोणालाही वाईट हेतूने काम करण्याची परवानगी दिली जाणार नसून न्याय मंत्रालयाच्या परवानगीशिवाय निदर्शनं करता येणार नाही. त्यासाठी मंत्रालयाची परवानगी घ्यावी लागणार आहे.
महिलांच्या खेळण्यावर बंदी
आता महिलांच्या खेळण्यावर बंदी घालण्याचा तालिबानचा हुकूम काढला आहे. तालिबानच्या कथित सांस्कृतिक विभागाचे उपप्रमुख अहमदुल्लाह वासिक यांनी एका मुलाखतीत म्हटलं आहे की, महिलांना क्रिकेट किंवा इतर खेळ खेळताना ज्यामध्ये त्यांचा चेहरा आणि शरीर दाखवलं जात असे खेळ खेळणं आवश्यक नाही आहे. मीडियाद्वारे त्यांचे फोटो लोकं बघतात. ज्याला इस्लाम परवानगी देत नाही.
BJPच्या बड्या मंत्र्याची टॉवेलनं गळा आवळून हत्या; संशयास्पद अवस्थेत आढळला मृतदेह
अफगाणिस्तानमध्ये तालिबान आल्यानंतर सर्व महिला क्रिकेटपटूंना लपून राहण्यास भाग पडलं आहे. अन्य महिला खेळाडूंचीही तीच परिस्थिती आहे. घरात आणि बुरख्यामध्ये महिलांना कैद करण्याच्या मोहिमेत तालिबानने पुन्हा सुरुवात केली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Afghanistan, Taliban