मराठी बातम्या /बातम्या /देश /सुरक्षा दलाची झाली चूक, माओवादी समजून निष्पापांना झाडल्या गोळ्या; 8 वर्षांनंतर खुलासा

सुरक्षा दलाची झाली चूक, माओवादी समजून निष्पापांना झाडल्या गोळ्या; 8 वर्षांनंतर खुलासा

विजापूर जिल्ह्यातील एडेस्मेटा येथे आठ वर्षांपूर्वी सुरक्षा दलानं एका चकमकीत आठजणांना ठार केलं होतं. (प्रातिनिधीक फोटो)

विजापूर जिल्ह्यातील एडेस्मेटा येथे आठ वर्षांपूर्वी सुरक्षा दलानं एका चकमकीत आठजणांना ठार केलं होतं. (प्रातिनिधीक फोटो)

छत्तीसगड राज्याच्या विजापूर जिल्ह्यातील एडेस्मेटा येथे आठ वर्षांपूर्वी सुरक्षा दलानं एका चकमकीत आठजणांना ठार केलं होतं. यामध्ये 4 अल्पवयीन मुलांसह आठजणांचा समावेश होता.

रायपूर, 10 सप्टेंबर: छत्तीसगड राज्याच्या विजापूर जिल्ह्यातील एडेस्मेटा येथे आठ वर्षांपूर्वी सुरक्षा दलानं एका चकमकीत आठजणांना ठार केलं होतं. यामध्ये 4 अल्पवयीन मुलांसह आठजणांचा समावेश होता. या घटनेच्या आठ वर्षानंतर संबंधित मृत आठजण माओवादी नसल्याचं समोर आली आहे. बुधवारी याबाबतचा चौकशी अहवाल मंत्रिमंडळात सादर करण्यात आला आहे. न्यायालयीन चौकशीनंतर या अहवालाच्या माध्यमातून धक्कादायक खुलासे काढण्यात आले आहेत. ज्यांना माओवादी  समजून ठार करण्यात आलं त्यातील कोणीही माओवादी नसल्याचं संबंधित अहवालात म्हटलं आहे.

मध्य प्रदेश उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश न्यायमूर्ती व्ही के अग्रवाल यांनी याबाबतचा चौकशी अहवाल सादर केला आहे. सुरक्षा दलानं घाबरून हा हल्ला केला असावा, असंही या अहवालात म्हटलं आहे. संबंधित घटना चुकीनं घडल्याचं संबोधून न्यायमूर्ती अग्रवाल यांनी म्हटलं की, 'मारले गेलेले आदिवासी हे निष्पाप आणि निशस्त्र होते. संबंधित आठजणांना एकूण 44 गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. त्यातील 18 गोळ्या या सीआरपीएफच्या कोब्रा युनिटच्या एका कॉन्स्टेबलनं फायर केल्याचंही अहवालात म्हटलं आहे.

हेही वाचा-...म्हणून महिला पोलिसानेच हवालदाराला संपवलं; मुंबईला हादरवणाऱ्या घटनेत नवं वळण

ही चकमक 2013 साली घडली होती. त्यानंतर मे 2019 मध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर सीबीआय या घटनेची स्वतंत्र चौकशी करत आहे. विशेष म्हणजे एडेस्मेटा येथे माओवाद्यांची उपस्थिती असल्याची बाब स्थानिक पोलिसांनी नाकारली होती. असं असतानाही कोब्रा दलानं माओवाद्यांच्या तळाचा  भांडाफोड केल्याचा दावा केला.

हेही वाचा-अमेरिकेत लोकांवर तुफान गोळीबार, तीन हल्लेखोरांचा शोध सुरु

एडेस्मेटा हे ठिकाणी विजापूर जिल्ह्यातील गंगलूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येते. याठिकाणी डाव्या विचारसरणीचे लोक सर्वाधिक आहेत. न्यायालयीन अहवालानुसार, घटनेच्या दिवशी 'बीज पंडम' नावाचा आदिवासी समुदायाचा सण होता. या सणाचं औचित्य साधत गावातील 25-30 लोकं एकत्रित जमले होते. दरम्यान सुरक्षा दलानं माओवादी समजून यांच्यावर हल्ला केला होता. या हल्ल्यात 4 अल्पवयीन मुलासह 8 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता.

First published:
top videos

    Tags: Chhatisgarh, Crime news