मराठी बातम्या /बातम्या /विदेश /

पुन्हा रक्तपात सुरू: अमेरिकेच्या माघारीनंतर तालिबानने दाखवले रंग, पंजशीरवर चढवला हल्ला

पुन्हा रक्तपात सुरू: अमेरिकेच्या माघारीनंतर तालिबानने दाखवले रंग, पंजशीरवर चढवला हल्ला

पंजशीर (Panjshir) आणि तालिबान यांच्यात काही दिवसांपूर्वीच अघोषित युद्धबंदी सुरु झाली होती. मात्र अमेरिका बाहेर पडताच पुन्हा तालिबाननं शस्त्रं (weapons) हाती घेतली आहेत.

  • Published by:  desk news

काबुल, 31 ऑगस्ट : अफगाणिस्तानमध्ये (Afghanistan) सरकार स्थापन केल्यानंतर शांततेची भाषा करणाऱ्या तालिबानने (Taliban) अमेरिका (America) देशाबाहेर पडताच रंग दाखवायला सुरुवात केली आहे. तालिबाननं अफगाणिस्तानमधील बहुतांश भाग आपल्या ताब्यात घेतला आहे. मात्र पंजशीरवर विजय मिळवण्यात तालिबानला अद्यापही यश आलेलं नाही. पंजशीर (Panjshir) आणि तालिबान यांच्यात काही दिवसांपूर्वीच अघोषित युद्धबंदी सुरु झाली होती. मात्र अमेरिका बाहेर पडताच पुन्हा तालिबाननं शस्त्रं (weapons) हाती घेतली आहेत.

तालिबान विरुद्ध पंजशीर

पंजशीर तालिबानच्या ताब्यात जाऊ देणार नाही, अशी भूमिका घेत नॉर्दर्न अलायन्सनं आपला लढा सुरू ठेवला आहे. अहमद मसूद यांच्या नेतृत्वाखाली पंजशीरमध्ये सैन्य लढाईसाठी तयार असून तालिबानचा सामना करण्यासाठी आपण सज्ज असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. सोमवारी रात्री तालिबाननं एकाच वेळी वेगवेगळ्या दिशेनं पंजशीरवर हल्ला चढवला आणि घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला. मात्र पंजशीरच्या नॉर्दर्न अलायन्सकडून त्याला जोरदार प्रत्युत्तर देण्यात आलं. या हल्ल्यात तालिबानचे 7 ते 8 फायटर्स ठार झाले, तर नॉर्दर्न अलायन्सचेही दोन सैनिक ठार झाल्याची माहिती मिळत आहे.

हजारा समुदायावरही अत्याचार

तालिबानकडून हजारा समाजाची बहुसंख्या असणाऱ्या दायकुंदा भागात तालिबान्यांनी हिंसाचार करण्याचा प्रयत्न केला आहे. या भागातील शिक्षण संस्थांमध्ये घुसून तिथल्या वाचनालयाची आणि संगणकांची तालिबानींनी नासधूस केली. या भागात मुलांसोबत मुलीदेखील शालेय शिक्षण घेत आहेत. ही बाब तालिबानला मान्य नसल्यामुळेच त्यांनी हा हल्ला केल्याचं स्थानिक पत्रकारांनी सांगितलं आहे.

हे वाचा - पाकिस्तानात जन्माष्टमीच्या दिवशी श्रीकृष्ण मंदिरात तोडफोड,भक्तांनाही केली मारहाण

पंजशीर भूमिकेवर ठाम

पंजशीरने तालिबानसोबत चर्चा करण्याची तयारी दाखवली आहे. तालिबानला ज्या प्रकारचे नियम आणायचे आहेत, ते आपल्याला मान्य नसून पंजशीर ते नियम मान्य करणाऱ नसल्याचं जाहीर करण्यात आलं आहे. आपण युद्ध करण्यासाठीदेखील तयार असल्याचं अहमद मसूद यांनी म्हटलं आहे. अफगाणिस्तान सरकारमधील काही सैन्यदेखील पंजशीरमध्ये दाखल झाल्याचं सांगितलं जात आहे.

First published:

Tags: Afghanistan, America, Taliban