• Home
 • »
 • News
 • »
 • videsh
 • »
 • पाकिस्तानात जन्माष्टमीच्या दिवशी श्रीकृष्ण मंदिरात तोडफोड, भक्तांनाही केली मारहाण

पाकिस्तानात जन्माष्टमीच्या दिवशी श्रीकृष्ण मंदिरात तोडफोड, भक्तांनाही केली मारहाण

पाकिस्तानात (Pakistan) अज्ञांतांनी जन्माष्टमीच्या दिवशी श्रीकृष्ण मंदिराची (Krishna Mandir) तोडफोड केली आहे. सोमवारी अज्ञांतांनी मूर्तीची तोडफोड केली.

 • Share this:
  सिंध, 31 ऑगस्ट : पाकिस्तानमध्ये कुरापती सुरुच आहेत. पाकिस्तानात (Pakistan) अज्ञांतांनी जन्माष्टमीच्या दिवशी श्रीकृष्ण मंदिराची (Krishna Mandir) तोडफोड केली आहे. सोमवारी अज्ञांतांनी मूर्तीची तोडफोड केल्याची घटना समोर आली. जन्माष्टमीचा उत्सव साजरा करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या मंदिरातील धार्मिक समारंभादरम्यान ही घटना घडली. या घटनेनंतर परिसरात तणावाचं वातावरण आहे. तसंच परिसरात पोलीस तैनात करण्यात आले असून याप्रकरणी अद्याप एकालाही अटक करण्यात आलेली नाही. सिंध प्रांतातील संघर जिल्ह्यातील खिप्रोमध्ये हा प्रकार घडला. पाकिस्तानी अॅक्टिविस्ट वकील राहत ऑस्टिन यांनी याबाबत माहिती दिली. पाकिस्तानातील सिंध प्रांतातील श्रीकृष्ण मंदिराची तोडफोड केल्याची माहिती त्यांनी ट्विटद्वारे दिली. श्रीकृष्ण मंदिरात भक्तांकडून श्रीकृष्ण जन्माष्टमीची पूजा सुरू असताना हा प्रकार घडला. या घटनेनंतर सोशल मीडियावर अनेक फोटो शेअर करण्यात येत आहेत. या महिन्याच्या सुरुवातीलाही लाहौरपासून जवळपास 590 किलोमीटरवर असणाऱ्या जिल्ह्यातील भोंग शहरात शेकडो लोकांनी हिंदू मंदिरात तोडफोड केली होती.

  पाकिस्तानची जगाला धमकी, तालिबानला मान्यता दिली नाही तर पुन्हा 9/11 चा धोका

  मूव्हमेंट फॉर सॉलिडॅरिटी अँड पीस (MSP) या मानवाधिकार संस्थेने दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानमध्ये दरवर्षी 1000 हून अधिक ख्रिश्चन आणि हिंदू महिला-मुलींचं अपहरण केलं जातं. त्यानंतर त्यांचं धर्मांतर केलं जातं आणि इस्लामिक रितीरिवाजानुसार निकाह केला जातो. या पीडितांमध्ये 12 ते 25 वयोगटातील तरुणी असल्याचं सांगितलं जातं.

  'आपसात युद्ध करा पण...', भारत-पाकिस्तानच्या वादावर तालिबानचं मोठं विधान

  अधिकृत अंदाजानुसार, 75 लाख हिंदू पाकिस्तानात राहतात. यापैकी अधिकतर सिंध प्रांतात राहतात. मागील वर्षी पाकिस्तानमध्ये अनेक मंदिरांवर हल्ले झाले होते. हिंदू पाकिस्तानातील सर्वात मोटा अल्पसंख्याक समुदाय आहे.
  Published by:Karishma
  First published: