मराठी बातम्या /बातम्या /विदेश /

धगधगत्या अफगाणिस्तानात पुन्हा रॉकेट हल्ला; तालिबाननं कंधार विमानतळाला बनवलं टार्गेट

धगधगत्या अफगाणिस्तानात पुन्हा रॉकेट हल्ला; तालिबाननं कंधार विमानतळाला बनवलं टार्गेट

तालिबाननं कंधार, गझनी, हेरात अशा महत्त्वाच्या शहरांवर आपला ताबा मिळवला आहे. (File Photo)

तालिबाननं कंधार, गझनी, हेरात अशा महत्त्वाच्या शहरांवर आपला ताबा मिळवला आहे. (File Photo)

अमेरिकनं आपलं सैन्य (American Army) माघारी घेतल्यापासून अफगाणिस्तानात (Went back from Afghanistan) मोठ्या प्रमाणावर हिंसक घटना घडत आहेत. मागील बऱ्याच दिवसांपासून अफगान सैन्य आणि तालिबान (Taliban) दहशतवादी संघटनेत धुमश्चक्री सुरू आहे.

पुढे वाचा ...
  • Published by:  News18 Desk

कंधार, 1 ऑगस्ट: अमेरिकनं आपलं सैन्य (American Army) माघारी घेतल्यापासून अफगाणिस्तानात (Went back from Afghanistan) मोठ्या प्रमाणावर हिंसक घटना घडत आहेत. मागील बऱ्याच दिवसांपासून अफगान सैन्य आणि तालिबान (Taliban) दहशतवादी संघटनेत धुमश्चक्री सुरू आहे. अफगाणिस्तानातील विविध भागांत नियंत्रण मिळवण्यासाठी तालिबानकडून सातत्यानं हल्ले (Attacks) करण्यात येत आहेत. आता अफगाणिस्तानातील कंधार विमानतळावर (Kandahar Airport) रॉकेट हल्ला (Rocket attack) केल्याची माहिती समोर आली आहे.

तालिबान्यांकडून कंधार विमानतळावर तीन रॉकेट डागले आहेत. यातील दोन रॉकेटचा धावपट्टीवर स्फोट झाला आहे. त्यामुळे या विमानतळावरून होणारी सर्व विमान उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. कंधार विमानतळाचे मुख्य अधिकारी मसूद पश्तून यांनी AFP या वृत्तसंस्थेला सांगितलं की, संबंधित धावपट्टी दुरुस्त करण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे. आज संध्याकाळपर्यंत हे काम पूर्ण होऊ शकतं.

हेही वाचा-पाकिस्तानचा दुतोंडीपणा चव्हाट्यावर, चीनसोबत संगनमत करून तालिबानला मदत

काल रात्री उशीरा झालेल्या या हल्ल्यात जीवितहानी झाल्याची कोणतीही माहिती अद्याप समोर आली नाही. पण या हल्ल्यानंतर सर्व उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. या हल्ल्यामागे तालिबानचा हात असल्याचं सूत्रांकडून सांगण्यात आलं आहे. कारण तालिबान संघटनेच्या दहशतवाद्यांनी कंधार शहराला चारही बाजूंनी घेरलं आहे. सध्या तालिबान आणि अफगाण सुरक्षा दलांचं युद्ध कंधारमध्येच सुरू आहे.

हेही वाचा-तालिबाननं दानिश सिद्दीकींची हत्या कशी केली? सुन्न करणारी माहिती आली समोर

कंधार हे अफगाणिस्तानातील दुसरं मोठे शहर आहे. येथील विमानतळाचा वापर अफगाण सैन्याला शस्त्रं आणि रसद पुरवण्यासाठी केला जातो. म्हणूनच तालिबानने या विमानतळावर हल्ला करून अफगाण सैन्याला मिळणारी मदत थांबवण्याचा प्रयत्न केला आहे. गेल्या 2 ते 3 आठवड्यांपासून  तालिबाननं या भागात हल्ले वाढवले ​​आहेत.

हेही वाचा-अफगाणिस्तानात पोहोचलं पाकिस्तानी सैन्य? तालिबानींसोबत फिरतानाचा VIDEO VIRAL

काही दिवसांपूर्वी अफगाणिस्तानातील 85 भागांवर कब्जा मिळवल्याचा दावा तालिबाननं केला होता. विशेष म्हणजे पूर्वी कंधार हेच तालिबानचं मुख्यालय होतं. त्यामुळे उत्तर अफगाणिस्तानसह कंधारमधील परिस्थिती दिवसेंदिवस बिघडत चालली आहे. त्यातच आता कंधार आंतरराष्ट्रीय विमानतळावर रॉकेट हल्ला करण्यात आला आहे.

First published:

Tags: Afghanistan, Attack, Crime news, Taliban