• Home
 • »
 • News
 • »
 • videsh
 • »
 • ‘ही’ अट पूर्ण नसेल, तर किराणाही मिळणार नाही! जर्मनीत नवा नियम

‘ही’ अट पूर्ण नसेल, तर किराणाही मिळणार नाही! जर्मनीत नवा नियम

कोरोना लसीकरणाला गती मिळवून (Strange condition by a state in Germany) देण्यासाठी जर्मनीतील एका राज्याने मोठी विचित्र अटक नागरिकांना घातली आहे.

 • Share this:
  बर्लिन, 18 ऑक्टोबर : कोरोना लसीकरणाला गती मिळवून (Strange condition by a state in Germany) देण्यासाठी जर्मनीतील एका राज्याने मोठी विचित्र अटक नागरिकांना घातली आहे. यापुढे जर नागरिकांनी लसीकरण केलं नसेल, तर त्यांना कुठल्याही स्टोअरमध्ये प्रवेश न देण्याचा निर्णय (No vaccination, no entry) सरकारनं घनतला आहे. लसीकरण न केलेले नागरिक कोरोनाच्या वाढीस कारणीभूत ठरू शकतात. त्यामुळे अशा नागरिकांना कुठल्याही दुकानात प्रवेश न देण्याचा (No entry for non-vaccinated people) निर्णय घेण्यात आला आहे. असा आहे नियम जर्मनी हेस्से राज्यानं हा नवा नियम तयार केला आहे. जर्मनीतील अनेक राज्यांमध्ये कोरोना लसीकरणाच्या सक्तीविरोधात मोर्चे आणि आंदोलनं सुरू असताना हेस्से राज्यानं मात्र हा धाडसी निर्णय घेतला आहे. लसीकरणाच्या सक्तीचाच हा एक वेगळा प्रकार असल्याची चर्चा सध्या जर्मनीत रंगली आहे. किराणा माल आणि इतर जीवनावश्यक वस्तू मिळवणं हा प्रत्येक नागरिकाचा मूलभूत अधिकार असला तरी या नव्या नियमाचा सामना आता जर्मनीतील हेस्से राज्यातील नागरिकांना करावा लागत आहे. दुकानदारांना मुभा या नियमाची अंमलबजावणी करायची की नाही, याची मुभा प्रत्येक दुकानदाराला देण्यात आली आहे. जर दुकानदाराचं या नियमाला समर्थन असेल, तर तो आपल्या दुकानाबाहेर तशी सूचना लावून लसीकरण न केलेल्या नागरिकांना प्रवेश नाकारू शकतो. तर काहीजणांना यावर आक्षेप असेल, तर ते मात्र नागरिकांना प्रवेश देऊ शकतात. हे वाचा- बांग्लादेशात हिंदूंवर हल्ले सुरूच, समाजकंटकांनी पेटवली 20 कुटुंबीयांची घरं 2 जी आणि 3 जी नियम या कायद्याच्या अंमलबजावणीसाठी 2जी आणि 3जी असे दोन नियम करण्यात आले आहेत. टू जी नियमानुसार केवळ लसीकरण झालेल्या आणि कोरोनातून बरे झालेल्या नागरिकांना प्रवेश देण्यात येणार आहे. तर थ्री जी नियमानुसार लसीकरण झालेल्या, कोरोनातून बरे झालेल्यांसोबत कोरोना निगेटिव्ह असणाऱ्यांनाही प्रवेश दिला जाणार आहे. मात्र याच्या अंमलबजावणीचं स्वातंत्र्य दुकानदारांना देण्यात आलं आहे.
  Published by:desk news
  First published: