• Home
 • »
 • News
 • »
 • videsh
 • »
 • बांग्लादेशात हिंदूंवर हल्ले सुरूच, समाजकंटकांनी पेटवली 20 कुटुंबीयांची घरं

बांग्लादेशात हिंदूंवर हल्ले सुरूच, समाजकंटकांनी पेटवली 20 कुटुंबीयांची घरं

बांग्लादेशात नवरात्रीपासून सुरू झालेला (Houses of 20 Hindu families burned in Bangladesh) समाजकंटकांचा उपद्रव सुरूच असून 20 हिंदू कुटुंबीयांची घरं पेटवून देण्यात आली आहेत.

 • Share this:
  ढाका, 18 ऑक्टोबर : बांग्लादेशात नवरात्रीपासून सुरू झालेला (Houses of 20 Hindu families burned in Bangladesh) समाजकंटकांचा उपद्रव सुरूच असून 20 हिंदू कुटुंबीयांची घरं पेटवून देण्यात आली आहेत. नवरात्रात अष्टमीच्या दिवशी हिंदू विरुद्ध मुस्लीम (Hindu Muslim conflict) वादाची ठिणगी पडली होती. त्यानंतर हिंसाचार सुरू झाला (Situation out of control) असून अद्यापही त्यावर नियंत्रण मिळवण्यात यंत्रणांना यश आलेलं नाही. पेटवली घरं बांग्लादेशातील रंगपूरमध्ये 20 हिंदू कुटुंबीयांची घरं पेटवून देण्यात आली आहेत. स्थानिक संघ परिषदेनं दिलेल्या माहितीनुसार समाजकंटकांनी आतापर्यंत 65 घरांमध्ये आगी लावण्याचा प्रयत्न केला. जमात-ए-इस्लामी आणि इस्लामी छात्र शिबीर यांच्या विद्यार्थी शाखेचे काही कार्यकर्ते हिंदूंवर हल्ले करण्याचा प्रयत्न करत असल्याची माहिती स्थानिक माध्यमांनी दिली आहे. बांग्लादेशातील प्रमुख वृत्तसंस्था dhakatribune.com नं दिलेल्या बातमीनुसार रंगपूरमध्ये 20 हिंदू कुटुंबीयांची घरं जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. रंगपूरमधील पीरगंज परिसरात ही घटना घडली असून या घरांमध्ये अगोदर तोडफोड आणि लुटमार करण्यात आली. त्यानंतर या घरांना आग लावण्यात आली. सोशल मीडियावरील पोस्टनंतर तणाव एका हिंदू व्यक्तीने सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या आक्षेपार्ह पोस्टनंतर हिंसाचार अधिकच भडकल्याची माहिती स्थानिक पोलिसांनी दिली. या घटनेनंतर पोलीस तातडीनं घटनास्थळी पोहोचले आणि पोस्ट करणाऱ्या तरुणाच्या घराभोवती त्यांनी सुरक्षा तैनात केली. मात्र त्यानंतर समाजकंटक इतस्ततः पांगले आणि त्यांनी दिसेल त्या घराला आग लावण्याचा निर्णय घेतला. आतापर्यंत 20 घरांना समाजकंटकांनी आग लावली आहे. हे वाचा- भीषण! मंदिरात गर्दीकडून भक्तांना जबर मारहाण, एकाचा मृत्यू; घटनेचा Live Vide काही भागात तणाव वाढला बांग्लादेशातील काही भागात तणाव कमालीचा वाढला आहे. विशेषतः चांदपूर, कॉक्स बाजार, बंदरबन, सिलहट, चटगाव आणि गाजीपूर या भागात सर्वाधिक तणाव असल्याची माहिती आहे. या सर्व भागात बांग्लादेशी सैनिक आणि पोलीस तैनात करण्यात आले आहेत.
  Published by:desk news
  First published: