मराठी बातम्या /बातम्या /विदेश /विमानाच्या चाकात लपून केला 6500 KM प्रवास, पण 10 तासानंतर...; आजही थरकाप उडवते त्या 2 भावांची कहाणी

विमानाच्या चाकात लपून केला 6500 KM प्रवास, पण 10 तासानंतर...; आजही थरकाप उडवते त्या 2 भावांची कहाणी

airplane

airplane

जेव्हा विमान टेकऑफसाठी तयार होतं तेव्हा दोन्ही भाऊ त्याच्या लँडिंग गियरमध्ये शिरले. दिल्ली ते लंडन या 6,693 किमी प्रवासासाठी फ्लाइटला 10 तास लागले आणि तोपर्यंत दोघांना विमानाच्या लँडिंग गियरमध्ये बसावं लागलं.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

नवी दिल्ली 16 जानेवारी : नेपाळमधील विमान दुर्घटनेनंतर विमानाच्या प्रवासाची सुरक्षितता आणि इतर काही मुद्दे चर्चेत आले आहेत. अशातच 1995 साली भारतातील पंजाबमध्ये घडलेली एक मोठी घटना पुन्हा एकदा प्रकाशात आली. काही वर्षांपूर्वी इथे खलिस्तानी दहशतीची भीती होती. 1995 सालापर्यंत सुरक्षा दलांनी इथून दहशतवाद्यांचा जवळपास खात्मा केला होता किंवा त्यांना देश सोडण्यास भाग पाडलं. दरम्यान, दररोज अनेकांना अटक होत असे. लोकांना त्यांच्या घरातून उचलून अनेक दिवस चौकशी केंद्रात ठेवण्यात यायचं. त्याच वर्षी, पोलिसांनी या प्रकरणात प्रदीप आणि विजय सैनी या दोघांनाही संशयित म्हणून पाहिलं.

आज तकने याबाबतचं वृत्त दिलं आहे. व्यवसायाने कार मेकॅनिक असलेले दोन्ही भाऊ खलिस्तानींना छुप्या पद्धतीने मदत करत असल्याचा आरोप पोलिसांनी केला होता. त्यावेळी प्रदीप 22 वर्षांचा होता, तर विजय 18 वर्षांचा होता. आपला खलिस्तानींशी संबंध नसल्याचे त्यांनी पोलिसांसमोर अनेकदा सांगितलं. पण त्यांची सतत चौकशी चालूच होती. त्यांना वारंवार चौकशी केंद्रात आणलं जात होतं. यामुळे दोन्ही भाऊ खूप अस्वस्थ झाले. अशा परिस्थितीत दोन्ही भावांनी देश सोडण्याचा निर्णय घेतला.

Nepal Plane Crash : 72 जणांसह विमान कोसळतानाच पहिला थरारक VIDEO समोर, 45 मृतदेह सापडले

त्यांच्या ओळखीचे बरेच लोक त्यावेळी लंडनमध्ये राहत होते. त्यामुळे दोघांनीही लंडनलाच जायचं ठरवलं. पण इथे अडचण अशी होती की दोन्ही भावांकडे ना पासपोर्ट होता ना लंडनला जाण्यासाठी पुरेसे पैसे. अशा परिस्थितीत दोन्ही भावांनी एका तस्कराशी संपर्क साधला जो लोकांना अवैधरित्या परदेशात पाठवायचा. दोघांनी त्या तस्कराला दीडशे पाउंड रक्कम दिली. विमानाच्या लगेज विभागात लपवून लंडनला पाठवणार असल्याचं त्याने दोन्ही भावांना सांगितलं.

तोपर्यंत 1996 साल आले होते. पोलिसांनी दोन्ही भावांना त्रास देणे सुरूच ठेवले. तर काही काळाने तो तस्करही कुठे गेला हे कळालं नाही. दोन्ही भाऊ त्याच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत होते. मात्र तो कुठेच सापडला नाही. त्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. आता दोघांनाही वाटू लागलं की काहीही झालं तरी चालेल. आता त्यांच्याकडे अजिबात पैसे नव्हते. मात्र त्यांना काहीही करून लंडन गाठायचं होतं.

त्यानंतर सप्टेंबर 1996 मध्ये दोन्ही भाऊ पंजाबहून दिल्लीत आले. त्यानंतर दोघेही दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाची पाहणी करू लागले. त्यावेळी विमानतळावर कमी सुरक्षा होती. त्यामुळे दोघेही विमानात प्रवेश करण्याचे मार्ग शोधत राहिले. पुढील 10 दिवस दोघांनी विमानतळाची पाहणी केली. त्यानंतर ऑक्टोबर 1996 मध्ये एका रात्री दोघेही ब्रिटिश एअरवेजच्या विमानात पोहोचण्यात यशस्वी झाले. सामान आणि प्रवासी विमानात येण्याची त्यांनी वाट पाहिली.

द सनच्या वृत्तानुसार, जेव्हा विमान टेकऑफसाठी तयार होतं तेव्हा दोन्ही भाऊ त्याच्या लँडिंग गियरमध्ये शिरले. स्मगलरसोबत काही काळ राहिल्यानंतर दोघांनाही विमानाबाबत बरीच माहिती मिळाली होती. लँडिंग गिअरमध्ये माणसाला बसण्यासाठी जागा आहे हे त्यांना माहीत होतं. दोघेही वेगवेगळ्या लँडिंग गियरमध्ये शिरले. कारण दोघेही एकाच लँडिंग गियरमध्ये एकत्र बसू शकत नव्हते. दिल्ली ते लंडन या 6,693 किमी प्रवासासाठी फ्लाइटला 10 तास लागले आणि तोपर्यंत दोघांना विमानाच्या लँडिंग गियरमध्ये बसावं लागलं.

दोघांनीही त्यावेळी सामान्य कपडे घातले होते. त्यांच्याकडे स्वेटर किंवा जॅकेटही नव्हते. ब्रिटिश एअरवेजचे हे विमान 40 हजार फूट उंचीवर वेगाने धावत होते. त्यामुळे ऑक्सिजनची कमतरता कायम राहिली. दोघेही एकमेकांशी बोलू शकत नव्हते. कारण इंजिनचा आवाज खूप जास्त होता. त्यामुळे दोघांच्या कानाचे पडदे फुटू लागले. दोघेही खूप घाबरायला लागले. आता आपला मृत्यू निश्चित आहे, असं त्यांना वाटलं. विमान हिथ्रो विमानतळावर पोहोचल्यानंतर सामान उतरवण्यासाठी आधी कर्मचारी पोहोचले. तिथे त्यांना एका व्यक्तीचा ओरडण्याचा आवाज आला.

Nepal Plane Crash : नेपाळच्या मृत्यू तांडवाचं चीन कनेक्शन, पोखरा एयरपोर्टवर 14 दिवसांपूर्वी काय झालं?

विमानाजवळ पोहोचताच त्यांना मोठा भाऊ प्रदीप अर्धमेल्या अवस्थेत दिसला. घाईघाईत त्यांनी त्याला दवाखान्यात नेलं. 4 दिवसांनी शुद्धीवर आल्यावर त्यानी सर्वप्रथम त्याचा भाऊ विजय याच्याबद्दल विचारलं. मात्र याबाबत कोणालाच माहिती नव्हती. प्रदीपला त्याच्याशिवाय विमानात दुसरं कोणी सापडले नसल्याचे सांगण्यात आलं. ना जिवंत ना मृत. दुसरीकडे, 40 हजार फूट उंचीवर प्रदीपने उणे 60 अंश तापमान कसं सहन केलं, याचं डॉक्टरांना आश्चर्य वाटलं.

त्याचवेळी पोलिसांनी प्रदीपचा भाऊ विजय याचा शोध सुरू केला. दुसऱ्या दिवशी रिचमंड परिसरातून पोलिसांना फोन आला, यावेळी एक मृतदेह सापडल्याची माहिती देण्यात आली. मृतदेहाचा फोटो प्रदीपला दाखवला असता त्याने तो लगेच ओळखला. हा मृतदेह विजयचा होता. विमानाने उड्डाण केल्यानंतर काही वेळातच विजयचा मृत्यू झाल्याचं पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये स्पष्ट झालं आहे.

दुसरीकडे, प्रदीप इतकं तापमान कसं सहन करू शकतो, यावर डॉक्टरांनी त्यांची थिअरी दिली. त्यांनी सांगितलं की जेव्हा तापमान कमी होऊ लागलं आणि वारे जोरात वाहू लागले. त्यानंतर ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे प्रदीपच्या शरीराने आजूबाजूला घडणाऱ्या घटनांवर प्रतिक्रिया देणं बंद केलं. तो हायबरनेशन सारख्या अवस्थेत पोहोचला. तो सुप्तावस्थेत गेला नसता तर इंजिनच्या आवाजाने त्याच्या नसा फुटल्या असत्या आणि तोही त्याच्या भावासारखाच मृत झाला असता.

First published:

Tags: Airplane, Shocking news, Travel by flight