मराठी बातम्या /बातम्या /विदेश /

ऑस्ट्रेलियात गांधींच्या पुतळ्याची तोडफोड; पंतप्रधान म्हणाले, शरम वाटली पाहिजे!

ऑस्ट्रेलियात गांधींच्या पुतळ्याची तोडफोड; पंतप्रधान म्हणाले, शरम वाटली पाहिजे!

ऑस्ट्रेलियात भारताचे (Statue of Mahatma Gandhi vandalized in Australia by anti social elements) राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्याची तोडफोड करण्यात आल्याची संतापजनक घटना घडली आहे.

    मेलबर्न, 15 नोव्हेंबर: ऑस्ट्रेलियात भारताचे (Statue of Mahatma Gandhi vandalized in Australia by anti social elements) राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्याची तोडफोड करण्यात आल्याची संतापजनक घटना घडली आहे. भारत सरकारने ऑस्ट्रेलियाला (Statue presented by Government of India) भेट दिलेली ही प्रतिमा होती. काही समाजकंटकांनी या पुतळ्यावर हल्ला करत त्याची तोडफोड करण्याचा प्रयत्न केला. यात पुतळ्याचं काहीसं नुकसान झालं असून ऑस्ट्रेलियाकडून याबाबत दिलगिरी (Australia PM apologizes) व्यक्त करण्यात आली आहे. काय म्हणाले पंतप्रधान? ऑस्ट्रेलियात महात्मा गांधींच्या पुतळ्याची तोडफोड होणं ही अतिशय दुःखद आणि संतापजनक घटना असून आपल्याला याबाबत खेद असल्याचं ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी म्हटलं आहे. ज्यानं कुणी हे कृत्य केलं असेल, त्याला लाज वाटायला हवी, असं ते म्हणाले. नुकतीच भारताकडून ऑस्ट्रेलियाला भेट देण्यात आली होती. भारताचे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा हा पुतळा कुणी मोडण्याचा प्रयत्न केला, त्याची चौकशी सुरू असून दोषींना शोधून त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल, असं ऑस्ट्रेलिया सरकारच्या वतीनं सांगण्यात आलं आहे. पोलिसांनी केलं अपील काही समाजकंटकांनी तारांचा वापर करून या पुतळ्याच मोडतोड करण्याचा प्रयत्न केला होता. जर कुणी ही घटना प्रत्यक्ष पाहिली असेल, तर त्याने समोर येऊन माहिती द्यावी, असं आवाहन ऑस्ट्रेलिया पोलिसांनी केलं आहे. हे वाचा- रहस्यमयी! या जंगलात गेलेलं कोणीच परत येत नाही; आत जाताच आत्महत्या करतात लोक अमेरिकेत गांधींचा गौरव अमेरिकेत महात्मा गांधींचा सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मान करण्याचा प्रस्ताव एका लोकप्रतिनिधीनं सभागृहात मांडला आहे. मरणोत्तर काँग्रेशनल गोल्ड मेडल हा अमेरिकेतील सर्वोच्च नागरी सन्मान मानला जातो. याच पुरस्काराने महात्मा गांधींचा मरणोत्तम गौरव करण्यात यावा, असा प्रस्ताव अमेरिकेच्या प्रतिनिधी सभेत दाखल झाला आहे. याबाबत लवकरच निर्णय़ अपेक्षित असून तमाम भारतीयांसाठी हा एक आनंदाचा क्षण असणार आहे.
    Published by:desk news
    First published:

    Tags: America, Australia, Mahatma gandhi

    पुढील बातम्या