मराठी बातम्या /बातम्या /विदेश /बाथरुममध्ये छुपा कॅमेरा पाहून हादरली महिला, 3 वर्षांपासून प्लंबरचा सुरू होता घृणास्पद प्रकार

बाथरुममध्ये छुपा कॅमेरा पाहून हादरली महिला, 3 वर्षांपासून प्लंबरचा सुरू होता घृणास्पद प्रकार

प्रतिकात्मक फोटो

प्रतिकात्मक फोटो

एका महिलेच्या घरात बाथरुममध्ये दुरुस्ती करण्यासाठी आलेल्या प्लंबरने बाथरुममध्ये छुपा कॅमेरा लावल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

लंडन, 3 नोव्हेंबर : एका महिलेच्या घरात बाथरुममध्ये दुरुस्ती करण्यासाठी आलेल्या प्लंबरने बाथरुममध्ये छुपा कॅमेरा लावल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. प्लंबर बाथरुममधील संपूर्ण गोष्टी त्या कॅमेरात रेकॉर्ड करत होता. काही दिवसांनंतर महिलेची नजर त्या छुप्या कॅमेरावर पडली आणि त्यानंतर तिने पोलिसांना याबाबत सुचना दिली. पोलिसांनी प्लंबरला अटक करुन त्याच्या घराचा तपास केला असता, त्याच्या घरात मिळालेल्या वस्तू पाहून पोलिसही हैराण झाले.

लग्नानंतर चौथ्या दिवशीच विवाहितेसोबत झाला घात; सूटकेसमध्ये आढळला मृतदेह

काय आहे प्रकरण -

डेली मेलने दिलेल्या माहितीनुसार, हे प्रकरण ब्रिटनमधील नॉटिंघम येथील आहे. येथील एका महिलेने 57 वर्षीय जेम्स हुल्मे या व्यक्तीला जून 2018 मध्ये घरात प्लम्बिंगचं काम करण्यासाठी बोलावलं होतं. त्यावेळी जेम्स हुल्मे या प्लंबरने महिलेच्या बाथरुममध्ये छुपा कॅमेरा लावला.

एक दिवस महिला बाथरुममध्ये अंघोळ करत असताना, तिची नजर अचानक कॅमेरावर गेली. तिने लगेचच याबाबतची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी प्लंबर जेम्स हुल्मे याला ताब्यात घेतलं आणि त्याच्या घराचा झडती घेतली. यावेळी पोलिसांनी त्या प्लंबरच्या घरात इतर लोकांच्या बाथरुममध्येही कॅमेरे लावलेले आढळले.

गरोदर पत्नीसोबत क्रूरतेचा कळस;पतीने जिवंत पेटवल्याने पोटातील बाळाचा दुर्दैवी अंत

त्याच्या घरातील कंप्यूटरमध्ये मुलांचे 302 फोटो आढळले. त्याशिवाय प्राणी आणि मनुष्याचे लैंगिक संबंधांचे फोटोही आढळले. अनेक महिलांच्या बाथरुममधील अश्लील फोटो आढळले. पोलिसांनी कारवाई करत त्याला कोर्टात हजर करण्यात आलं. निर्णयानंतर आता त्याला नॉटिंघम क्राउन कोर्टने 12 महिन्यांची तुरुंगवासाची शिक्षा सुनावली.

First published:
top videos

    Tags: Camera