मराठी बातम्या /बातम्या /विदेश /

लग्नानंतर चौथ्या दिवशीच विवाहितेला दिला भयंकर मृत्यू; सूटकेसमध्ये आढळला मृतदेह

लग्नानंतर चौथ्या दिवशीच विवाहितेला दिला भयंकर मृत्यू; सूटकेसमध्ये आढळला मृतदेह

एका नवविवाहित (Groom Killed Bride) पतीवर पत्नीच्या हत्येचा आरोप करण्यात आला आहे.

एका नवविवाहित (Groom Killed Bride) पतीवर पत्नीच्या हत्येचा आरोप करण्यात आला आहे.

एका नवविवाहित (Groom Killed Bride) पतीवर पत्नीच्या हत्येचा आरोप करण्यात आला आहे.

  • Published by:  Pooja Vichare

युरोप, 03 नोव्हेंबर: एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ब्रिटनमध्ये एका नवविवाहित (Groom Killed Bride) पतीवर पत्नीच्या हत्येचा आरोप करण्यात आला आहे. लग्नानंतर चार दिवसांनी नव्या वधूचा सुटकेसमध्ये मृतदेह आढळल्यानं एकच खळबळ उडाली. या हत्येप्रकरणी पोलिसांनी पतीला (Husband Arrested)अटक केली आहे. काय आहे हे संपूर्ण प्रकरण जाणून घेऊया.

'द सन यूके'च्या वृत्तानुसार, 52 वर्षीय महिला डॉन वॉकर (Dawn Walker) आणि 45 वर्षीय थॉमस नट (Thomas Nutt) यांचं बुधवारी लग्न झालं. मात्र लग्नानंतर चार दिवसांनी डॉन वॉकरचा (Dawn Walker Murder) मृतदेह एका मैदानात आढळून आला. वॉकर यांचा मृतदेह सूटकेसमध्ये बंद अवस्थेत आढळला. तिचा गळा दाबून हत्या केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

हेही वाचा- रवी शास्त्रींच्या सहकाऱ्यानं पुन्हा केला टीम इंडियाच्या कोचपदासाठी अर्ज 

लग्नाला आलेल्या पाहुण्यांनी सांगितलं की, या जोडप्यानं जानेवारी 2020 मध्ये साखरपुडा केल्यानंतर अनेक महिन्यांपासून लग्नाचं प्लानिंग करत होते. अखेर त्यांनी गेल्या बुधवारी रजिस्ट्रर ऑफिसमध्ये लग्न केलं. ज्यामध्ये दोघांचे नातेवाईक आणि मित्रमंडळी सहभागी झाले होते. वॉकरचं पहिलं लग्न झालं होतं. पहिल्या पतीपासून त्यांना दोन मुलं होती.

एका नातेवाईकानं सांगितलं की, वॉकर आणि थॉमस दोघांचे एकमेकांवर खूप प्रेम होते, अचानक काय झाले यावर माझा विश्वास बसत नाही. वॉकर यांची 49 वर्षीय बहीण लिसा वॉकर म्हणाली, "मला खूप दुःख झालं आहे."

हेही वाचा-  परवानगी मिळताच प्रवासी सुसाट, एका दिवसात मुंबई लोकलच्या 2 लाख तिकिटांची विक्री

या हत्येप्रकरणी वेस्ट यॉर्कशायर पोलीस प्रवक्तानं सांगितलं की, आम्ही पुष्टी करतो की हॅलिफॅक्समध्ये एका महिलेचा मृतदेह सापडला आहे. हत्येच्या संशयावरून एका 45 वर्षीय पुरुषाला अटक करण्यात आली आहे. सध्या या हत्येचा तपास सुरू आहे.

First published:

Tags: Murder, Murder news