Home /News /videsh /

टॉयलेटमध्ये अडकला कॅप्टन अन् विमान पायलटविना; प्रवाशांमध्ये गोंधळ, मात्र शेवटी...

टॉयलेटमध्ये अडकला कॅप्टन अन् विमान पायलटविना; प्रवाशांमध्ये गोंधळ, मात्र शेवटी...

अशा धोक्याच्या प्रसंगी प्रवाशांमध्ये घबराट पसरली.

    लंडन, 13 जून : अनेकदा विमानात काही बिघाड झाला तर आपात्कालीन लँडिंग केली जाते. अन्यथा अनेक धोके उद्भवू शकतात. अशीच एक घटना समोर आली आहे. लंडनमधील (London News) इजी जेटच्या एका विमानाची आपात्कालीन लँडिंग करावी लागली. आजारी पडलेला पायलट टॉयलेटमध्ये अडकल्याने विमानात खळबळ उडाली. यानंतर एडिनबर्ग एअरपोर्टवर आपात्कालीन लँडिंग करण्यात आली. अचानक विमान लँड केल्यामुळे प्रवासीही घाबरले. इजीजेट विमान EZY6938 ने 12 जूनच्या सकाळी ग्रीसच्या स्कॉटलँडहून उड्डाण घेतलं होतं. विमानाला फर्स्ट ऑफिसरने 1.20 AM ला आपल्या नियंत्रणात आणलं होतं. यापूर्वी पायलट टॉयलेटमध्ये गेले होते. विमान लँड होईपर्यंत ते परतले नव्हते. द सनच्या रिपोर्टनुसार, फस्ट ऑफिसरने विमानाचं लँडिंग केलं, मात्र पायलट टॉयलेटमधून बाहेर निघाला की, नाही हे मात्र सांगितलं नाही. एका प्रवाशाने सांगितलं की, आम्ही विमानाच्या कॅप्टनला टॉयलेटमध्ये जाताना पाहिलं होतं, मात्र तो बाहेर पडताना दिसला नाही. रनवेवर पोहोचली फायर ब्रिगेड... आपात्कालीन लँडिंगची सूचना मिळताच रन-वेवर 5 फायर ब्रिगेडच्या गाड्या आल्या आणि 2 रुग्णवाहिका तैनात करण्यात आल्या. प्रवाशांनी सांगितलं की, विमानाच्या को पायलटने स्पीकरवर सांगितलं की, कॅप्टन आजारी असल्या कारणाने आपात्कालीन लँडिक करावी लागली. को-पायलटने पुढे सांगितलं की, गेल्या 13 तासांपासून ते ड्यूटीवर होते. ईजी जेटने दिलं स्पष्टीकरण... द सनच्या रिपोर्टनुसार, ईजी जेटच्या प्रवक्त्यांनी सांगितलं की, कॅप्टन अचानक आजारी पडल्यामुळे एडिनबर्ग एयरपोर्टवर लँडिंग करावी लागली. फर्स्ट ऑफिसरने विमानाचं स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजरसह लँडिंग केलं,

    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Airplane, London, Travel by flight

    पुढील बातम्या