मराठी बातम्या /बातम्या /विदेश /थायलँडला सुट्टीसाठी गेलेल्या 37 वर्षीय मॉडेलचा दुर्देवी मृत्यू; पार्टीदरम्यान ड्रग्स घेतल्याचा संशय

थायलँडला सुट्टीसाठी गेलेल्या 37 वर्षीय मॉडेलचा दुर्देवी मृत्यू; पार्टीदरम्यान ड्रग्स घेतल्याचा संशय

थायलँड दौरा मॉडेलसाठी धोकादायक ठरला आहे.

थायलँड दौरा मॉडेलसाठी धोकादायक ठरला आहे.

थायलँड दौरा मॉडेलसाठी धोकादायक ठरला आहे.

नवी दिल्ली, 13 जून : अडल्ट पार्टी (Adult Party) सुरू असताना 8 व्या मजल्यावरुन पडल्यामुळे मॉडल एवजेनिया स्मिरनोवा (37) हिचा मृत्यू (Model Death) झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आता या प्रकरणात पोलिसांनी एक अमेरिकी व्यक्ती आणि 2 अन्य जणांना अटक केली आहे. तिघांच्या निष्काळजीपणामुळे मॉडेलचा जीव गेल्याचा आरोप लावण्यात आला आहे.

ही घटना थायलँडमधील फुकेतच्या पटोंग रिसॉर्टमध्ये घडली. हा रेडलाइन एरिया आहे. रशियन मॉडेल एवजेनिया स्मिरनोवा, अपार्टमेंटहून 80 फूट खाली पडली होती. 31 मे रोजी ही घटना घडली. वेबकॅम मॉडेल एवजेनिया स्मिरनोवाबद्दल सांगण्यात येत आहे की, ती अनेक सोशल मीडिया साइट्सवर होती. ज्यात ती स्वत: लाइव्ह येऊ आपले व्हिडीओ शेअर करीत होती. इमारतीवरुन खाली पडताना एवजेनियाच्या हातात काही केस सापडले आहेत. पोलीस त्या केसांचा फॉरेन्सिक तपास करीत आहे. याच्या माध्यमातून घटनेच्या वेळे तेथे कोण कोण होतं, याचा खुलासा होईल. आठव्या मजल्यावरुन खाली पडल्यामुळे या मॉडेलच्या डोक्याला गंभीर जखम झाला आणि तिचा पायही तुटला.

25 मे रोजी फुकेत दौरा...

स्मिरनोवा मूळतं: रशियातील एका लहानशा गावात राहत होती. मात्र कालांतराने ती मॉस्कोमध्ये येऊन राहू लागली. ती 25 मे रोजी फुकेतला पोहोचली होती. बँकॉक पोस्टच्या रिपोर्टनुसार, पोलिसांना संशय आहे की, पार्टीत लोकांनी ड्रग्सचं सेवन केलं होतं.

First published:

Tags: Crime news, Model