• Home
 • »
 • News
 • »
 • videsh
 • »
 • भयंकर ! आधी पार्टी केली मग मित्रावर 40 मिनिटांत केले 107 वार, प्रायव्हेट पार्ट कापून डोळाही काढला

भयंकर ! आधी पार्टी केली मग मित्रावर 40 मिनिटांत केले 107 वार, प्रायव्हेट पार्ट कापून डोळाही काढला

40 मिनिटांत मित्रावर केले 107 वार, गुप्तांग कापून डोळाही काढला आणि मग... (प्रातिनिधिक फोटो)

40 मिनिटांत मित्रावर केले 107 वार, गुप्तांग कापून डोळाही काढला आणि मग... (प्रातिनिधिक फोटो)

Crime News Marathi: मित्रानेच मित्रावर धारदार शस्त्राने वार करुन हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

 • Share this:
  नवी दिल्ली, 29 ऑक्टोबर : एका इसमाने आपल्याच मित्रावर धारदार शस्त्राने वार करुन हत्या (murder) केली आहे. धक्कादायक म्हणजे ही हत्या इतक्या निघृणपणे करण्यात आली आहे जी ऐकल्यानंतर सर्वांनाच धक्का बसला आहे. एका शेफने आपल्याच मित्राची हत्या केली आहे. शेफने 40 मिनिटांत 100 हून अधिकवेळा चाकूने वार (stabbed with sharp weapon) करुन मित्राची हत्या केली आहे. ही घटना इंग्लंडमध्ये (England) घडली आहे. 40 मिनिटांत 107 वार ही हत्या इतक्या निर्दयीपणे करण्यात आली की, आरोपी शेफने मित्राची हत्या केल्यावर त्याचा गुप्तांगही कापला आहे. 20 वर्षीय लुईस एशडाऊन याने 18 वर्षीय मार्क विलियम्स याला पार्टीसाठी बोलावले आणि त्यानंतर त्याला घेऊन जंगलात गेला. जेव्हा मार्क विलियम्स याने व्हिस्की प्यायली त्यानंतर शेफ लुईस याने मार्कवर हल्ला केला. हत्येनंतर गुप्तांगही कापला लुईस याने मार्कवर 40 मिनिटांत एकामाकेएक असे एकूण 107 वार केले. इतकेच नाही तर मार्क याचा गुप्तांग कापला आणि त्यानंतर त्याचे डोळेही चाकूने काढले. आज तक डॉट इनने या संदर्भातील वृत्त दिलं आहे. हे कृत्य करत असताना शेफ लुईस याने आपल्या मोबाइलमध्ये व्हिडीओ सुद्धा शूट केला आहे. या व्हिडीओत दिसत आहे की, तो आपल्या मित्र्याच्या डोक्यावर लात मारत आहे. त्याला मारहाणही करत आहे. या घटनेनंतर पोलिसांनी आरोपी लुईस एशडाऊन याला पोलिसांनी अटक केली असून लुईस क्राऊन कोर्टात हजर केले. मार्क विलियम्स आणि लुईस एशडाऊन यांची सहा महिन्यांपूर्वीच मैत्री झाली होती. वाचा : पोलीस स्टेशनपासून अवघ्या 200 मीटरवर तरुणाची हत्या, डोक्यात वार करुन संपवलं 29 मे रोजी लुईस आणि मार्क या दोघांनी एकमेकांना मेसेज करुन भेटण्याचा प्लान केला. पार्टी करण्यासाठी विलियम्सने यासाठी बिअर, व्हिस्की आणि कोक खरेदी करुन ठेवले होते. दोघांनीही पार्टी केली आणि त्यानंतर नशेत असलेल्या मार्क विलियम्स याच्यावर लुईसने हल्ला केला. विलियम्स याच्या चेहऱ्यावर, पाठीत, छातीवर, हातावर डोळ्यांत असे शरीराच्या विविध भागांत 107 वार केले. लुईसने मार्क विलियम्स याची हत्या केल्यावर आपले कपडू काढून शेजारील नाल्यात फेकून दिले. या हत्येप्रकरणी दुसऱ्याच दिवशी पोलिसांनी आरोपी लुईस एशडाऊन याला अटक केली. अटक केल्यावर एशडाऊन याने पोलिसांसमोर आपला गुन्हा कबूल केला आहे. वाचा : फेसबुकवरील मैत्री जीवावर बेतली; तरुणाच्या आत्महत्येनं झाला लव्ह स्टोरीचा The End मार्क विलियम्स आपल्याला त्रास देत होता आणि त्यामुळेच त्याची हत्या केली असल्याचं आरोपी लुईस एशडाऊन याने पोलिसांना सांगितले आहे. दरम्यान हत्येमागचं नेमकं कारण काय आहे? तसेच इतक्या निघृणपणे हत्या करण्यासारखं पाऊस लुईस याने का उचललं यावरुन विविध तर्क वितर्क लावण्यात येत आहेत.
  Published by:Sunil Desale
  First published: