मराठी बातम्या /बातम्या /kolhapur /

Kolhapur: फेसबुकवरील मैत्री जीवावर बेतली; तरुणाच्या आत्महत्येनं झाला लव्ह स्टोरीचा The End

Kolhapur: फेसबुकवरील मैत्री जीवावर बेतली; तरुणाच्या आत्महत्येनं झाला लव्ह स्टोरीचा The End

Suicide in Kolhapur: कोल्हापूर जिल्ह्याच्या शिरोळ तालुक्यातील यड्राव येथील एका तरुणाने बुधवारी आपल्या राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या (Young man commits suicide) केल्याची घटना उघडकीस आली आहे.

  • Published by:  News18 Desk
कोल्हापूर, 29 ऑक्टोबर: कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्याच्या शिरोळ तालुक्यातील यड्राव येथील एका तरुणाने बुधवारी आपल्या राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या (Young man commits suicide) केल्याची घटना उघडकीस आली आहे. संबंधित तरुणाने हनी ट्रॅपच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या (Suicide in honey trap case) केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. तरुणाच्या मृत्यूनंतर आलेल्या एका फोन कॉलमुळे आत्महत्येच्या कारणाचा खुलासा झाला आहे. सागर बाबुराव रणनवरे असं आत्महत्या करणाऱ्या 28 वर्षीय तरुणाचं नाव आहे. मृत सागर याची काही दिवसांपूर्वी फेसबुकवर एका तरुणीसोबत ओळख (Facebook friendship) झाली होती. त्यानंतर दोघांतील या ओळखीचं रुपांतर मैत्रीत झालं आणि फेसबुक चॅंटींगसोबत दोघांत व्हिडीओ कॉलदेखील होऊ लागले. आरोपी महिलेनं फेसबुक चॅंटीगद्वारे सागरचा विश्वास संपादन करत त्याला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढलं. हेही वाचा-मध्यरात्री मुंबईत रंगला सायको किलरचा थरार; 15मिनिटात दगडाने ठेचून दोघांना संपवलं दरम्यान, एकेदिवशी आरोपी तरुणीने सागरला अश्लील व्हिडीओ कॉल (Obscene video call) केला. तसेच सागरलाही अश्लील कृत्य करण्यास भाग पाडलं. यावेळी आरोपी तरुणीने स्क्रीन रेकॉर्डद्वारे संबंधित व्हिडीओ कॉल रेकॉर्ड केला. या व्हिडीओच्या आधारे आरोपी तरुणीने सागरला हनीट्रॅपच्या जाळ्यात ओढलं आणि संबंधित अश्लील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल  (Threat to viral obscene video) करण्याची धमकी दिली. हेही वाचा-आधी झोपेच्या गोळ्या दिल्या मग पेट्रोल ओतून पेटवलं!गर्लफ्रेंडने दिला क्रूर मृत्यू आरोपी तरुणीच्या त्रासाला कंटाळून सागरने बुधवारी आपल्या घरातील लोखंडी अँगलला गळफास घेत आत्महत्या केली आहे. सागरच्या मृत्यूनंतर त्याच्या मोबाइलवर आरोपी महिलेचा फोन आला होता. यावेळी तिने सागरच्या नातेवाईकांना धमकी दिली आहे. याप्रकरणी पोलिसांत फिर्याद दाखल केली आहे. तांत्रिक माहितीच्या आधारे पोलीस घटनेचा पुढील तपास करत आहेत.
First published:

Tags: Crime news, Kolhapur, Suicide

पुढील बातम्या