Home /News /nagpur /

Nagpur: पोलीस स्टेशनपासून अवघ्या 200 मीटरवर तरुणाची हत्या, डोक्यात वार करुन संपवलं

Nagpur: पोलीस स्टेशनपासून अवघ्या 200 मीटरवर तरुणाची हत्या, डोक्यात वार करुन संपवलं

Nagpur Crime news: नागपुरात पोलीस स्टेशनपासून हाकेच्या अंतरावर तरुणाची हत्या झाल्याची घटना समोर आली आहे.

नागपूर, 29 ऑक्टोबर : नागपुरात (Nagpur) गुन्हेगारीच्या घटना काही कमी होताना दिसत नाहीयेत. आता नागपुरात पुन्हा एका तरुणाची धारदार शस्त्राने हत्या (youth murdered with sharp weapon) करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. नागपुरातील महाल भागातील टाऊन हॉल जवळ नर्सिंग टॉकीज समोर (Nursing Talkies near Town Hall)  तरुणाची हत्या करण्यात आली आहे. डोक्यात तीक्ष्ण हत्याराने वार करुन ही हत्या करण्यात आली आहे. वर्दळीच्या परिसरात घडलेल्या या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. धक्कादायक म्हणजे ज्या ठिकाणी ही घटना घडली आहे तेथून हाकेच्या अंतरावर पोलीस स्टेशन आहे. नागपुरातील कोतवाली पोलीस स्टेशन पासून 200 मीटर अंतरावर ही हत्या झाली आहे. यामुळे नागपुरातील कायदा आणि सुरक्षेचा प्रश्न उपस्थित झाला आहे. जर पोलीस स्टेशनपासून हाकेच्या अंतरावर अशा प्रकारची घटना घडत असेल तर इतर ठिकाणी काय परिस्थिती असेल असा सवाल उपस्थित होत आहे. वाचा : फेसबुकवरील मैत्री जीवावर बेतली; तरुणाच्या आत्महत्येनं झाला लव्ह स्टोरीचा The End दरम्यान हा मृतक तरुण कोण आहे याची माहिती मिळू शकलेली नाहीये. त्यासोबतच या तरुणाची कोणी आणि का हत्या केली याबाबतही अद्याप माहिती मिळू शकलेली नाहीये. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत. बेपत्ता वडिलांची तक्रार द्यायला गेला अन् समोरच दिसला मृतदेह दोन दिवसांपूर्वी नागपुरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली होती. नागपुरातील बेलतरोडी परिसरातील एका तरुणाचे वडील गेल्या काही तासांपासून बेपत्ता झाले होते. दुसऱ्या दिवशीही वडील घरी न आल्याने संबंधित तरुण वडील बेपत्ता असल्याची पोलिसांत तक्रार देण्यासाठी गेला होता. दरम्यान तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यात गेला असता, त्याठिकाणी रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या आपल्या वडिलांचा मृतदेह त्याला दिसला आहे. या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेचा तपास बेलतरोडी पोलीस करत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित बेपत्ता झालेल्या 53 वर्षीय व्यक्तीचं नाव अरुण घरडे असून ते वाहन चालक होते. सोमवारी रात्री घरातून बाहेर पडल्यानंतर, दुसऱ्या दिवशीही ते परत आले नाहीत. दरम्यान बेपत्ता झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी नागपुरच्या आऊटर रिंग रोड परिसरात घरडे यांचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळून आला होता. याठिकाणी झाडीत अनेक ठिकाणी रक्ताचे डाग देखील आढळून आले होते.
Published by:Sunil Desale
First published:

Tags: Crime, Nagpur

पुढील बातम्या