उत्तर कोरिया, 25 डिसेंबर: क्रूर हुकूमशहा किम जोंग उनच्या (Kim Jong Unn) देशात खास पुरुषांसाठी (Males) एका खासगी हॉस्पिटल (Private Hospital) सुरु करण्यात आल्याची घटना नुकतीच समोर आली आहे. गुगल मॅपच्या (Google Maps) माध्यमातून अचानकपणे ही गोष्ट लक्षात आली आहे. खरं तर उत्तर कोरियातील (North Korea) अनेक बाबी छुप्या ठेवल्या जातात. तिथले अनेक गोरखधंदे हे तिथल्या हुकूमशाहीकडून लपवून ठेवले जातात आणि देशाची प्रतिमा खराब होऊ नये, यासाठी या बाबी जगापुढे आणल्या जात नाहीत. मात्र आधुनिक तंत्रज्ञानामुळे यातील बऱ्याचशा गोष्टी लपून राहत नाहीत आणि अनेक विस्मयजनक गोष्टी समोर येतात. अशीच एक विचित्र बाब नुकतीच समोर आली आहे.
गुगल मॅपवरून समजली माहिती
एक व्यक्ती उत्तर कोरिया परिसरातील काही माहिती मिळवण्यासाठी गुगल मॅपच्या माध्यमातून संशोधन करत होती. त्यावेळी त्याची नजर मॅपमधील एका लोकेशनवर पडली. त्याने झूम करून पाहिलं, तर ते एक हॉस्पिटल होतं. त्याने त्याबाबत अधिक माहिती काढण्याचा प्रयत्न केला. त्याला जी माहिती मिळाली, ती वाचून मात्र त्याची हसून हसून पुरेवाट झाली.
पुरुषांसाठी ‘खासगी’ हॉस्पिटल
पुरुषांच्या गुप्तांगांवर उपचार करण्यासाठी हे हॉस्पिटल उभारण्यात आल्याचं दिसून आलं. या हॉस्पिटलचं नाव ‘पी-पी हॉस्पिटल’. अनेक पुरुष या हॉस्पिटलला येऊन उपचार करून जात असल्याचंही समोर आलं. तर अनेकांनी ही माहिती खोटी असून केवळ वैद्यकीय उपचारांसाठी हे हॉस्पिटल असल्याचा दावा केला आहे. तर अनेकांनी हे गुप्तांगांवर उपचार आणि कॉस्मॅटिक सर्जरी करणारं हॉस्पिटलच असल्याचं म्हटलं आहे.
हे वाचा - अटल बिहारी वाजपेयींच्या पुतळ्याच्या अनावरणाला राज्य सरकारने परवानगी नाकारली?
ठिकठिकाणी विचित्र नावं
उत्तर कोरियात ठिकठिकाणी विचित्र नावांनी अशा प्रकारची हॉस्पिटल्स आणि इतर इमारती उभारण्यात आल्याचं यापूर्वीही दिसून आलं आहे. इंटरनेटच्या जगात उत्तर कोरियानं लपवलेल्या अशा अनेक गोष्टी चव्हाट्यावर येत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Kim jong un, North korea, Private hospitals