मराठी बातम्या /बातम्या /विदेश /

सेक्स पार्टनर समजून समुद्री साप करताहेत माणसांवर हल्ले; कमरेला वेटोळं घालून होते सुरुवात

सेक्स पार्टनर समजून समुद्री साप करताहेत माणसांवर हल्ले; कमरेला वेटोळं घालून होते सुरुवात

काही दिवसांपूर्वी समुद्री साप (Sea snake attack divers) पोहणाऱ्यांवर हल्ले करत असत असल्याचं दिसून आलं. हे साप माणसांना आपला सेक्स पार्टनर (Sex Partner) असल्याचं समजून त्यांच्यावर हल्ले करत असल्याचं संशोधनातून स्पष्ट झालं आहे.

कॅनबेरा, 30 ऑगस्ट : ऑस्ट्रेलियात (Australia) घरात साप (Snake) आढळल्याच्या बातम्या सातत्याने येत असतात. हे साप घरात आरामात लपून बसलेले असतात. परंतु, या सापांनी हल्ला केल्याच्या बातम्या तुरळकच ऐकायला मिळतात. काही दिवसांपासून मात्र सापांनी माणसांवर हल्ले (snake Attack Australia) केल्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. या हल्ल्यांमध्ये समुद्रात पोहणाऱ्यांवर हल्ले होण्याचं प्रमाण जास्त आहे. साप एवढे आक्रमक का झाले, याचं कारण लोकांना समजत नव्हतं. परंतु, नुकतंच याचं कारण स्पष्ट झालं आहे.

काही दिवसांपूर्वी समुद्री साप (Sea snake) पोहणाऱ्यांवर (Divers) हल्ले करत असत असल्याचं दिसून आलं. हे साप माणसांना आपला सेक्स पार्टनर (Sex Partner) असल्याचं समजून त्यांच्यावर हल्ले करत असल्याचं संशोधनातून स्पष्ट झालं आहे. ऑस्ट्रेलियातल्या मॅक्वेरी विद्यापीठाने केलेल्या संशोधनातून असं स्पष्ट झालं आहे, की हे साप डायव्हर्सवर हल्ला करत असून, त्यांना अनेक ठिकाणी दंश (Bite) करतात.

सेक्सचा अड्डा झालं Covid सेंटर; ड्रग्स, सिगारेट, हुक्का आणि...; CCTV मधून खुलासा

खरं तर समुद्री साप जमिनीवर राहणाऱ्या सापांच्या तुलनेत अधिक विषारी असतात; मात्र माणसांना या सापांचा दंश झाल्याच्या घटना यापूर्वी घडत नव्हत्या. आता मात्र त्या घटना घडत आहेत. 1935मध्ये समुद्री सापाच्या दंशात मृत्यू झाल्याची पहिली घटना नोंद झाली होती. त्यानंतर दुसरी अशीच घटना 2018 मध्ये नोंदली गेली; मात्र सध्या या घटनांमध्ये लक्षणीय वाढ होत आहे.

माणसांना समजत आहेत प्रेमी

ऑस्ट्रेलियातील डायव्हर्सनी सापांकडून सातत्याने असं होत असल्याचं स्पष्ट केलं आहे. समुद्री सापाने दंश केल्यानंतर मृत्यू होण्याची शक्यता कमीच असते; मात्र समुद्री सापाच्या दंशानंतर स्नायू दुखणं, अशक्तपणा, उलटी होणं किंवा लकवा मारणं अशी लक्षणं दिसून येतात. विद्यापीठाने आपल्या संशोधनात स्कूबा डायव्हर्सवर (Scuba Divers) होत असल्यालेल्या हल्ल्याचं जे कारण सांगितलं आहे, ते खूपच धक्कादायक आहे.

चाटता चाटता सिंहाने तिच्या चेहऱ्याचे लचके तोडले; कॅमेऱ्यात कैद झालं खतरनाक दृश्य

समुद्री साप स्कूबा डायव्हर्सना आपला संभाव्य प्रेमी (Mating Partner) समजून त्यांच्यावर हल्ले करत असल्याचं संशोधनातून स्पष्ट झालं आहे.

या ठिकाणी करतात दंश

समुद्री साप डायव्हर्सच्या कमरेभोवती वेटोळं घालून त्यांना दंश करतात. या संशोधनादरम्यान बायोलॉजिस्ट टीम लिंच यांना दिसून आलं, की हे साप माणसाला आपला सेक्स पार्टनर समजत आहेत. त्यामुळे ते माणसांवर हल्ले करत आहेत. या अभ्यासावेळी टीम लिंच यांच्याकडे एक समुद्री साप सोपवण्यात आला. या सापाने त्यांच्यावर 13 वेळा हल्ला केला. ऑगस्टनंतर सापांचे हे हल्ले कमी होतील. कारण त्यांचा मीलनकाळ तेव्हा संपेल, असं लिंच यांनी स्पष्ट केलं.

First published:

Tags: Attack, Australia, Snake