केपटाऊन, 30 ऑगस्ट : सिंह (Lion), वाघ, चित्ता असे कधीही न दिसणारे प्राणी आपल्याला दिसले की त्यांना पाहून घाम फुटतोच. पण त्यांना जवळून पाहण्याचा मोहही अनेकांना आवरत नाही. अशा प्राण्यांना जवळून पाहण्यासाठी सफारी पार्कमध्ये (Safari Park) लोक गाडीने जातात. हे प्राणी जेव्हा आपल्या गाड्यांजवळ येतात तेव्हा ते तसे खूप क्युट वाटतात, पण शेवटी ते हिंस्र प्राणी. कितीही क्युट वाटले तरी कधी डाव साधतील सांगू शकत नाही (Animal Attack Human). असंच एक खतरनाक दृश्य कॅमेऱ्यात कैद झालं आहे (Lion attack). दक्षिण आफ्रिकेत (South africa) सफारी पार्कमध्ये एका सिंहाने गाडीत बसलेल्या महिलेवर अशा पद्धतीने हल्ला केला आहे (Lion Attack At Safari Park), जो पाहूनच अंगावर अक्षरशः काटा येतो. सिंहाने गाडीच्या खिडकीच्या आतमध्ये आपलं तोंड टाकलं. सुरुवातीला महिलेला जिभेने चाटलं आणि त्यानंतर तिच्या चेहऱ्याचे लचके तोडले. हे वाचा - VIDEO: कासवाला शिकार करताना पाहिलंय का? हा दुर्मिळ क्षण बघाच, जाणकारही हैराण हे प्रकरण 2015 सालातील आहे. गेम ऑफ थ्रोन्स या गेम शोची एडिटर कॅथरीन चॅपल (Katherine Chappell) सफारी पार्कमध्ये (Lion Attack At Safari Park) फिरायला गेली. तिथं तिच्यावर सिंहाने भयंकर हल्ला केला. कॅथरीनच्या कारच्या मागे असलेल्या पर्यटकांच्या कॅमेऱ्यात हे खतरनाक दृश्य कैद झालं. या व्यक्तीने आता या भयंकर घटनेचे काही फोटोज शेअर केले आहेत. बेन गोवंडेर असं या पर्यटकाचं नाव आहे. बेनने सांगितलं की, सिंह कॅथरीनच्या कारच्या खिडकीतून आत डोकावत होता. सफारी पार्कमध्ये कॅथरीन सिंहाच्या खूप जवळच होती. सुरुवातीला हे दृश्य पाहायला खूप क्युट वाटत होतं आणि अचानक भयंकर दुर्घटनेत बदललं. सिंह अचानक खिडकीच्या आत डोकं टाकलं आणि कॅथरीनचं तोंड आपल्या जबड्यात धरलं. सिंहाने जेव्हा आपलं तोंड खिडकीतून बाहेर काढलं तेव्हा त्याचं तोंड रक्ताने माखलं होतं. त्याच्या तोंडातून रक्त गळत होतं आणि तो मांस चावत होता. हे वाचा - त्या माकडाला पाहून घाबरला बिबट्या; समोर दिसताच ठोकली धूम, पाहा VIRAL VIDEO सर्वकाही इतकं लवकर झालं की, काहीच समजलं नाही. जो सिंह तिला क्युट वाटत होता, तो अचानक हिंसक बनला. कॅथरीनचा चेहरा आणि खांद्यावर हल्ला केला. कॅथरीनसोबत त्या कारमध्ये टूरिस्ट गार्डही होती. गार्डने तिला वाचवण्यासाठी सिंहाच्या तोंडावर मुक्का मारला पण तरी सिंहाने कॅथरीनला सोडलं नाही. ही घटना प्रत्यक्षात पाहून गार्डला हार्ट अटॅकही आला. कॅथरीनला रुग्णालयात नेण्यात आलं, पण तिचा मृत्यू झाला, असं बेनने सांगितलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.