Home /News /videsh /

सेक्सचा अड्डा झालं Covid सेंटर; ड्रग्स, सिगारेट, हुक्का आणि...; CCTV मधून मोठा खुलासा

सेक्सचा अड्डा झालं Covid सेंटर; ड्रग्स, सिगारेट, हुक्का आणि...; CCTV मधून मोठा खुलासा

CCTV मध्ये हा सर्व प्रकार पाहिल्यानंतर अधिकाऱ्यांना धक्काच बसला.

    बँकॉक, 30 ऑगस्ट : कोरोना व्हायरस (Coronavirus) महासाथीचा सामना करणाऱ्या नागरिकांवर उपचार करण्यासाठी उभारलेल्या कोरोना सेंटरमधून भयावह घटना समोर येत आहेत. ही घटना थायलँडमधील (Thailand) एक कोरोना रुग्णालयातील (Covid Hospital) आहे. येथे काही रुग्णांनी ड्रग्स (Drugs) घेतले आणि रुग्णालयाच्या बेडवर ग्रुप सेक्स (Group Sex) केल्याचे वृत्त समोर आले आहे. CCTV मध्ये झाला खुलासा द नेशन थाइलँडच्या वृत्तानुसार, रुग्णालयात हा धक्कादायक प्रकाराबद्दल ऐकून अधिकाऱ्यांनाही धक्का बसला आहे. रुग्णांकडून असं कृत्य रोखण्यासाठी कोविड रुग्णालयांमध्ये छापेमारी केली जात आहे. नुकतचं थायलँडच्या इंटरनल सिक्युरिटी ऑपेरशन कमांड ऑफिसरनी PPE किट घालून अनेक सेंटर्सवर छापेमारी केली आहे. यादरम्यान सेंटरमधील तब्बल 1000 रुग्णांची चौकशी करण्यात आली आहे. मात्र सेंटरमधून ड्रग्स मिळालं नाही. मात्र मोठ्या प्रमाणात सिगारेट आणि हुक्का सापडला आहे. या टीमकडून रुग्णालयांचे सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत. ज्यात तरुण-तरुणी एकमेकांच्या वॉर्डमध्ये जात असल्याचं दिसलं आहे. झी न्यूजने यासंदर्भातील वृत्त प्रसिद्ध केलं आहे. हे ही वाचा-'प्रेयसीला बोलावलं तर आत्मा भटकत राहील'; सुसाइड नोट लिहून तरुणाची आत्महत्या सेंट्रल थायलँडमध्ये कोरोनाची रुग्णसंख्या वाढत आहेत. यासाठी आपात्कालीन सेंटर्स तयार करण्यात आले आहेत. येथे रुग्णांवर उपचार केले जातात. मात्र रुग्णसंख्या कमी होताच येथे सेक्स, ड्रग्स सारखी प्रकरण घडत असल्याचं समोर येत आहे. काही सेंटर्समध्ये तर रुग्णांमध्ये वाद झाल्याचंही समोर आलं आहे. सर्वाधिक तक्रारी बँकॉकमधील डॉन मुआंग एअरपोर्टच्या वेअरहाऊसमधील 1800 बेड असलेल्या सेंटरमधून समोर येत आहे. या प्रकरणात अधिकाऱ्यांनी कडक कारवाईचे आदेश दिले आहे.

    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Covid centre, Crime news, Sex, Thailand

    पुढील बातम्या